(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NED T20 Score Live : भारताचा नेदरलँडवर दमदार विजय, 56 धावांनी दिली मात
IND vs NED T20 : भारतीय क्रिकेट संघ टी20 विश्वचषकाची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध विजयाने झाल्यानंतर आज भारतासमोर नेदरलँड संघाचं आव्हान असणार आहे.
LIVE
Background
India vs Netherlands, T20 Record : टी20 क्रिकेट विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड (India vs netherlands) संघ आमने-सामने असणार आहेत. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील महत्त्वाचा सामना असून भारताने विजय मिळवल्यास ते गुणतालिकेत आणखी आघाडी घेऊ शकता. रविवारी अर्थात 23 ऑक्टोबरला भारताने पाकिस्तानला रोमहर्षक सामन्यात पराभूत केले होते. ज्यानंतर टीम इंडिया आता दुसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे नेदरलँड यंदा चांगल्या फॉर्मात असून त्यांनी दोन सामने जिंकले आहेत. तर भारतानेही विजयाने सुरुवात केल्याने एक रंगतदार सामना आज पाहायला मिळू शकतो. त्यात आजवर भारत आणि नेदरलँड दोघेही एकदिवसीय सामन्यात आमने-सामने आले असले तरी टी20 फॉर्मेटमध्ये दोन्ही संघाचा एकमेंकाविरुद्ध आजचा पहिलाच सामना असेल.
नेदरलँड आणि भारत यांच्यात आजवर फक्त दोनच सामने झाले असून हे दोन्ही सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. या दोन्ही संघांनी आधी फेब्रुवारी 2003 मध्ये पहिला सामना खेळला होता. या सामन्यात टीम इंडियाने 68 धावांनी विजय मिळवला. तर दुसरा सामना मार्च 2011 मध्ये झाला होता. भारताने हा सामना 5 विकेट्सनी जिंकला. ज्यानंतर आज दोघेही पहिलाच टी20 सामना ते देखील टी20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीमध्ये खेळत आहेत.
कसे आहेत टी20 विश्वचषक 2022 साठी दोन्ही संघ?
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह
राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर
नेदरलँड्सचा संघ
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार/ विकेटकिपर), विक्रमजीत सिंह, मॅक्स ओडॉड, बास डी लीडे, कॉलिन अकरमन, टॉम कूपर, टिम प्रिंगल, लोगन व्हॅन बीक, शरीझ अहमद, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, टिम व्हॅन डर गुगटेन , स्टीफन मायबर्ग, तेजा निदामनुरु, ब्रॅंडन ग्लोव्हर.