IND vs BAN, Playing 11 : भारताचा विजयी 'चौकार'? बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11; 'या' खेळाडूंना आजमावणार
World Cup 2023 : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात पुण्यातील क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर 19 ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता सामना रंगणार आहे.
IND vs BAN, Playing 11 : यंदाच्या विश्वचषकात (World Cup 2023) भारताची विजयी वाटचाल सुरु आहे. पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवत टीम इंडिया (Team India) पॉईंट्स टेबल (Points Table) मध्ये अव्वल स्थानावर आहे. वर्ल्ड कप 2023 (ODI World Cup 2023) सलामी सामन्यात ऑस्ट्रेलिया त्यानंतर अफगाणिस्तान (Afghanistan) आणि पाकिस्तान (Pakistan) चा पराभव करत भारताने सर्व तीन सामने जिंकले आहेत. आता टीम इंडियाचा सामना बांगलादेश (India vs Bangladesh) विरुद्ध असणार आहे. 19 ऑक्टोबरला पुण्यातील (Pune) क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर (Maharashtra Cricket Association Stadium) दुपारी दोन वाजता हा सामना रंगणार आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. सध्या विश्वचषक 2023 मधील ग्रुप सामने सुरु आहे. स्पर्धा अजून मोठी असून बेंचवरील खेळाडूंनाही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड प्लेईंग 11 बाबत आश्वस्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आगामी सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग 11 मध्ये काही बदल होताना दिसण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे.
2019 च्या तुलनेने टीम इंडियात बदल नाही
- 2019 च्या तुलनेने टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होताना दिसत नाहीत.
- विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेणाऱ्या मोहम्मद शमीला अद्याप संधी मिळालेली नाही.
- जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज प्रभावी खेळी करताना दिसत आहेत, तर तिसरा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याची भूमिकाही स्पष्ट दिसत आहे.
- सपाट खेळपट्ट्यांवर शार्दुल ठाकूरला फलंदाजी अष्टपैलू म्हणून मैदानात उतरवलं जात आहे, तर खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असेल तर, द्रविड अश्विनसह रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवला संधी दिली जात आहे.
- सलामीवीर शुभमन गिल परतला आहे. कर्णधार रोहित शर्मा चांगली खेळी करताना दिसत आहे.
- श्रेयस चौथ्या क्रमांकावर फिट आहे. यामुळे सूर्यकुमार यादवला बाहेर बसावं लागत आहे. विश्वचषकापूर्वी सूर्याला एक्स फॅक्टर मानलं जात होतं.
टीम इंडियाबाबत 'या' प्रश्नांची उत्तरे शोधणं गरजेचं
दरम्यान, असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे संघ व्यवस्थापनाला शोधावी लागणार आहेत.. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून संघ हार्दिकवर विश्वास ठेवू शकतो की नाही. शार्दूल ठाकूरच्या जागी शमीला घ्यावं की नाही, कारण आतापर्यंत आठव्या क्रमांकाच्या फलंदाजाला फलंदाजी करण्याची वेळ आलेली नाही. शमीला लीग टप्प्यातील शेवटच्या सामन्यांमध्ये संधी मिळू शकते. भारताला साखळी टप्प्यातील शेवटचा सामना 12 नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध रंगणार आहे.
एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
महत्वाच्या इतर बातम्या :