IND vs AUS Final 2023: जो टॉस जिंकेल, तो मॅच जिंकणार? भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये नाणेफेकीचं महत्त्व किती?
IND vs AUS Final 2023: भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंन्स यांनी टॉस जिंकल्यावर कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनंतर सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का?... हा प्रश्न विचारण्याचं कारण विश्वचषकाच्या महायुद्धात वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत (IND vs AUS Final 2023) निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येत आहेत. फायनल अगोदर सर्वात जास्त चर्चा असते ती टॉसची... कारण टॉस ही दोन धारी तलवार मानली जाते. मोठ्या मॅचमध्ये टॉस जिंकणारा संघच फायनल जिंकतो, असे म्हटले जाते.
क्रिकेट मॅचमध्ये नाणेफेक ही फार महत्त्वाची ठरते. वर्ल्डकपमध्ये टॉस हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असतो. हा टॉस आतापर्यंत टीम इंडियाच्या फेव्हरमध्ये राहिला आहे. परंतु आजच्या मॅचसाठी टॉस हा निर्णायक ठरणार आहे. टॉसचा निर्णय हा दोन्ही कर्णधारांना मोठ्या संकटात टाकू शकतो. टॉस दोनधारी तलवार आहे. मैदानावरील कामगिरी सोबत अनेक संघाचे नशिब टॉसवर देखील ठरते. पहिल्यांदा गोलंदाजी करायची त्यानंतर समोरच्या टीमने दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करत विजय मिळवणे सहज शक्य होते. पाकिस्तानच्या टीम विरोधात देखील टीम इंडियाने पहिल्यांदा बोलिंगचा निर्णय घेतला आणि धावांचा पाठलाग करत सहज विजय मिळवला. परंतु आज ज्या पीचवर मॅच होणार आहे त्या पिचवर अगोदर भारत- पाकिस्तानची मॅच झाली. या पीचवर विकेट मिळवणे थोडे कठीण जाते. त्यामुळे दोन्ही कर्णधारांसाठी हे टेन्शन असणार आहे. जर टॉस जिंकून बोलिंग घेतली तर नंतर स्कोअर चेस करणे सोपे जाईल. परंतु हा निर्णय कदाचीत अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण नंतर संघावर दबाव वाढत जातो. अनेक वेळा तर अशी परिस्थिती असते की टॉसच्या वेळीच नक्की होते की कोणता संघ विजयी होणार आहे.
मोठ्या मॅचमध्ये स्कोअरबोर्डचा प्रेशर
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 11 पीच आहेत. ज्या पीचवर भारत- पाकिस्तानची मॅच झाली त्या पीचवरच मॅच होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत विश्वचषकातील टॉसवर नजर मारली तर तो संघ टॉस जिंकतो त्या संघाचा कल बॅटिंग करण्याकडे असतो. असे म्हटले जाते की, मोठ्या मॅचमध्ये जो संघ फलंदाजी निवडतो त्यांना फायदा होतो. कारण नंतर फलंदाजी करणाऱ्या टीमवर दवाब अधिक असतो. त्यामुळे मोठ्या मॅचमध्ये टॉस जिंकणे महत्त्वाचे असते. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंन्स यांनी टॉस जिंकल्यावर कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा: