(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS Final 2023: बुमराहचा वाऱ्याचा वेग, शामी, सिराजचा भेदक मारा, जड्डूची फिरकी; ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाच्या 'फॅब 5' गोलंदांजांचं आव्हान
India vs Australia World Cup Final 2023: भारतीय माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघाला 300 धावांचा पल्ला कधीही पार करता आला नाही. भारतीय संघाने साखळीतील सर्वच नऊ सामने जिंकून स्पर्धेत वर्चस्व दाखवलेय. भारताच्या गोलंदाजीचे जगभरातून कौतुक होत आहे.
IND vs AUS World Cup 2023 Final: रोहित शर्माच्या भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनंतर सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का?... हा प्रश्न विचारण्याचं कारण विश्वचषकाच्या महायुद्धात वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत निर्णायक लढाई होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात (World Cup 2023 Final) भारतीय गोलंदाजी आक्रमण सर्वात बेस्ट असल्याचे अनेक दिग्गजांनी सांगितलेय. त्याला साक्ष आकडे देत आहेत. भारतीय माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघाला 300 धावांचा पल्ला कधीही पार करता आला नाही. भारतीय संघाने साखळीतील सर्वच नऊ सामने जिंकून स्पर्धेत वर्चस्व दाखवलेय. भारताच्या गोलंदाजीचे जगभरातून कौतुक होत आहे.
यंदाच्या विश्वचषकात भारतीय गोलंदाजी आक्रमण सर्वात बेस्ट असल्याचे अनेक दिग्गजांनी सांगितलेय. त्याला साक्ष आकडे देत आहेत. भारतीय माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघाला 300 धावांचा पल्ला कधीही पार करता आला नाही. भारतीय गोलंदाजांनी 85 विकेट घेतल्या आहेत. भारताचे तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांच्यासह फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी चमकदार कामगिरी केली आहे. विश्वचषकाच्या साखळी टप्प्यात भारताच्या सलग नऊ विजयांमध्ये या पाच जणांचे महत्त्वाचे योगदान होते. या पाच गोलंदाजांपुढे प्रतिस्पर्धी ढेर झालेत. मोहम्मद शामी 23 विकेट्सह आघाडीवर आहे. जसप्रीत बुमराहने 18 विकेट घेतल्या आहेत. रविंद्र जडेजाने 16 फलंदाजांची शिकार केली. कुलदीप यादवने 15 विकेट घेतल्या आहेत. तर मोहम्मद सिराजने 13 विकेट घेतल्यात. भारतीय गोलंदाजांनी यंदाच्या विश्वचषकात 85 विकेट घेतल्या. आता फायनलमध्ये टीम इंडिया कशी कामगिरी करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
भारताचे 'फॅब 5' गोलंदाज
नाव | सामने | विकेट |
मोहम्मद शमी | 06 | 23 |
जसप्रीत बुमराह | 10 | 18 |
रविंद्र जडेजा | 10 | 16 |
कुलदीप यादव | 10 | 15 |
मोहम्मद सिराज | 10 | 13 |
भारताला रविवारी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकण्याची तिसरी संधी आहे. पण ऑस्ट्रेलियावर मात करणं तितकं सोपं नाहीये. फिरकीमध्ये अॅडम झॅम्पा हा स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या जोडीला मॅक्सवेल आणि हेजलवुड आहेच. त्याशिवाय मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांच्या खांद्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. ऑस्ट्रेलिय गोलंदाजांनी 71 विकेट घेतल्या आहेत. अॅडम झॅम्पाचे नाव आघाडीवर असून त्याने आतापर्यंत 22 विकेट घेतल्या आहेत. दर दुसऱ्या क्रमांकावर हेजलवूड असून त्याने 14 विकेट घेतल्या आहेय
ऑस्ट्रेलियाच्या 'टॉप 5' गोलंदाज
नाव | सामने | विकेट |
अॅडम झॅम्पा | 10 | 22 |
जॉश हेजलवूड | 10 | 14 |
मिचेल स्टार्क | 09 | 13 |
पॅट कमिन्स | 10 | 13 |
ग्लेन मॅक्सवेल | 07 | 05 |
हे ही वाचा :