एक्स्प्लोर

पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तरचं ट्वीट अन् मोहम्मद शामीचा भन्नाट रिप्लाय, म्हणाला...

T20 World Cup Final: बेन स्टोक्स आणि सॅम करनच्या दमदार खेळीच्या बळावर इंग्लंडनं विश्वचषकावर नाव कोरलं.

T20 World Cup Final: बेन स्टोक्स आणि सॅम करनच्या दमदार खेळीच्या बळावर इंग्लंडनं विश्वचषकावर नाव कोरलं. जोस बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघानं फायनलमध्ये पाकिस्तानचा पाच विकेटनं पराभव केला. फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांची मनं तुटली. अनेकजण निराश झाले होते. सामन्यानंतर अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या. पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही पराभवानंतर सोशल मीडियावर ट्वीट केले आहेत. यामध्ये वेगवागन गोलंदाज शोएब अख्तर यानेही पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर ट्वीट केले आहे. शोएबच्या ट्वीटला भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याने प्रत्युत्तर दिलं आहे. मोहम्मद शामीचं हे ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. शामीच्या ट्वीटनंतर सोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तानचे चाहत्यांचं सोशल वॉर सुरु झालेय. 

इंग्लंडनं पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषक उंचावल्यानंतर निराश झालेल्या शोएब अख्तरनं 💔 असं ट्वीट केले होते. याला मोहम्मद शामीनं रिप्लाय दिलाय. Sorry brother It’s call karma 💔💔💔 असं ट्वीट करत शामीनं शोएब अख्तरला उत्तर दिलेय. शामीचं हे ट्वीट चर्चेचा विषय झालाय. यावर भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये सोशल वॉर सुरु झालेय. अनेकांनी यावर रिप्लाय देत खिल्ली उडवली आहे. तर काही पाकिस्तानच्या चाहत्यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्याचं स्कोअरबोर्ड शेअर करत शामीला उत्तर दिलं आहे. भारतीय चाहत्यांनी शामीच्या बाजूनं ट्वीट केले आहेत. 

मोहम्मद शामीचं ट्वीट -

सामन्यात काय झालं?
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा पाच विकेट्सनं पराभव  केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानच्या संघानं निर्धारित 20 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 137 धावांपर्यंत मजल मारली होती.  शान मसूद (38) आणि बाबर आझम (32) यांचा अपवाद वगळता पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लंडकडून सॅम करनने भेदक मारा केला. सॅम करन याने 12 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. अदिल रशीद आणि ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत सॅम करनला चांगली साथ दिली. पाकिस्ताननं दिलेलं 138 धावांचं आव्हान इंग्लंड संघाने 19 व्या षटकात पार केलं. बेन स्टोक्स याने 52 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी इंग्लंडला विजय मिळवून दिला. त्याशिवाय कर्णधार जोस बटलर याने 26 धावांची खेळी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget