Virat Kohli Birthday: किंग कोहलीच्या कारकिर्दीतील 10 विराट विक्रम
Happy Birthday Virat Kohli: भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
Happy Birthday Virat Kohli: भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात विराट कोहलीच्या बॅटीतून धावांचा पाऊस पाहायला मिळालाय. या स्पर्धेत भारतानं जिंकलेल्या तिन्ही सामन्यात विराट कोहलीनं महत्वाची भूमिका बजावली. विराटनं चार सामन्यातील तीन डावात पन्नास धावांचा टप्पा ओलांडलाय. टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील अखेरच्या सामन्यात भारत रविवारी झिम्बाब्वेशी भिडणार आहेत. दरम्यान, विराट कोहलीच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कारकिर्दीतील 10 मोठ्या विक्रमांवर एक नजर टाकुयात.
विराट कोहलीच्या कारकिर्दितील 10 मोठे विक्रम
1) कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतक
कसोटी कर्णधार म्हणून सात द्विशतक झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ब्रायन लारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं कर्णधार म्हणून पाच द्विशतके झळकावली आहेत.
2) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावा
विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा केल्या आहेत. त्यानं 205 डावांमध्ये हा पराक्रम केला. याबाबतीत त्यानं भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरलाही मागं टाकलंय. सचिननं 259 डावात एकदिवसीय क्रिकेटमधील 10 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
3)आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला
विराट कोहलीने पदार्पणाच्या 10 वर्षे आणि 68 दिवसांनंतर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 10,000 धावांचा टप्पा पार केला. अशाप्रकारे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अशी कामगिरी करणारा फलंदाज ठरला. याबाबती विराट कोहलीनं राहुल द्रविडला मागं टाकलं. राहुल द्रविडनं 10 वर्षे 317 दिवसांत ही कामगिरी केली होती.
4) एकदिवसीय क्रिकेटच्या अवघ्या 11 डावांत 1000 धावा
विराटनं 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या हसिम अमलाचा विक्रम मोडत अवघ्या 11 डावांमध्ये 1000 एकदिवसीय धावांचा आकडा गाठला होता. एका कॅलेंडर वर्षातील ही सर्वात जलद 1000 धावसंख्या आहे.
5) तिन्ही फॉरमेटमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी
तिन्ही फॉरमॅटमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरी असलेला विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे. तसेच, त्यानं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
6) कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1460 धावा
विराटनं 2017 मध्ये कर्णधार म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 हजार 460 धावा केल्या होत्या. कर्णधार म्हणून एका वर्षातील ही सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी हा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधारानं 2007 मध्ये 1427 धावा केल्या होत्या.
7) कर्णधार म्हणून सहा एकदिवसीय शतकं
कर्णधार म्हणून एका वर्षात सहा एकदिवसीय शतकं झळकावणारा विराट कोहली हा पहिला कर्णधार आहे. 2017 आणि 2018 मध्ये त्यानं हा पराक्रम केला होता.
8) विराटच्या नेतृत्वात भारताची विजयी टक्केवारी
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीची 75.89 टक्के विजयाची टक्केवारी आहे. हे कोणत्याही भारतीय कर्णधारापेक्षा जास्त आहे.
9) सलग तीन एकदिवसीय शतक
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन शतक झळकावणारा विराट कोहली पहिला फलंदाज आहे. त्यानं 2018 मध्ये हा पराक्रम केला होता.
10) आयपीएलमधील सर्वाधिक धावा
विराट कोहलीनं आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 हजार 872 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
हे देखील वाचा-