(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022 : भारताकडून विश्वचषकात कार्तिक की पंत कोणाची लागणार वर्णी, कशी आहे दोघांची आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्द
यंदाच्या वर्षी टी20 विश्वचषक खेळवला जाणार असून ऑस्ट्रेलियामध्ये ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने भारताने संघबांधणीही अप्रत्यक्षरित्या सुरु केली आहे.
Dinesh Karthik and Rishabh Pant : यंदा टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) थरार ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात पाहायला मिळणार आहे. आता या भव्य स्पर्धेसाठी केवळ 4 महिने शिल्लक असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अप्रत्यक्षरित्या संघबांधणीही सुरु केली आहे. दरम्यान सध्या सुरु असलेले भारतीय संघाचे सामने या संघबांधणीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या सामन्यानंतर कोणत्या खेळाडूंना विश्रांती द्यायची आणि कोणाला खेळवायचं असे अनेक प्रश्न बीसीसीआय़ला पडत आहेत.
नुकतीच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी20 मालिका पार पडल्यानंतर आता भारत आयर्लंड आणि नंतर इंग्लंडविरुद्धही टी20 सामने खेळणार आहे. दरम्यान सध्या झालेल्या सामन्यांतून भारतीय निवडकर्त्यांसमोर एक मोठा प्रश्न पडला आहे. तो म्हणजे विश्वचषकात यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक की ऋषभ पंत (Dinesh karthik or Rishabh Pant) यांच्यातील कोणाला संधी द्यायची. कारण पंत हा जरी सध्या कायमस्वरुपी यष्टीरक्षक असला तरी कार्तिकने आधी आयपीएल आणि मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी करत संघात स्वत:च स्थान जवळपास निश्चित केलं आहे. दरम्यान या प्रश्नाचं उत्तर तर संघ जाहीर झाल्यानंतरच मिळेल, पण तोवर दोन्ही खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया...
फलंदाजी सरासरी : आंतराष्ट्रीय टी20 सामन्यात ऋषभ पंतने 23.15 च्या सरासरीने तर दिनेश कार्तिकने 35.07 च्या बॅटिंग अॅव्हरेजने धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्यातरी दिनेश यामध्ये पुढे असल्याचं दिसून येत आहे.
बॅटिंग स्ट्राईक रेट : आंतराष्ट्रीय टी20 सामन्यात ऋषभ पंतचा स्ट्राईक रेट 123.91 इतका आहे. तर दिनेश कार्तिकचा स्ट्राईक रेट 146.13 इतका आहे. त्यामुळे यातही दिनेश पुढे आहे.
विकेटकीपिंग : आंतराष्ट्रीय टी20 सामन्यात ऋषभ पंतने 48 सामन्यात 23 बळी घेण्यात मदत केली आहे. तर दिनेश कार्तिकने 37 सामन्यात 20 फलंदाजांना बाद करण्यात मदत केली आहे. त्यामुळे यष्टीरक्षणातही कार्तिक पंतला चांगलीच टक्कर देत आहे.
IPL 2022 मध्येही कार्तिक पंतच्या पुढे
आयपीएळ 2022 (IPL 2022) स्पर्धेतही ऋषभने 30.91 च्या सरासरीने आणि 151.78 च्या स्ट्राईक रेटने रन केले. तर दिनेश कार्तिकने 55 च्या सरासरीने आणि 183.33 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. त्यामुळे दिनेशचीच कामगिरी चांगली असल्याचं यावेळीही पाहायला मिळालं.
हे देखील वाचा-