एक्स्प्लोर

T20 World Cup 2022 : 'पाकिस्तानची नवी जर्सी कलिंगडासारखी वाटतेय', पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनेच उडवली खिल्ली

Pakistan Team : आगामी टी20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेसाठी पाकिस्तानने आपली नवी कोरी समोर आणली असून ही जर्सी पाकिस्तानी क्रिकेट फॅन्सना खास आवडली नसून माजी खेळाडू दानिश कनेरियानेही जर्सीची खिल्ली उडवली आहे.

Pakistan Team Jersey : आगामी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup) स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने (Pakistan Cricket Team) नवी-कोरी जर्सी सादर केली आहे. पण पाकिस्तानची ही जर्सी पाकिस्तानच्याच क्रिकेट फॅन्सना आवडलेली नाही. फॅन्सनी आतापर्यंत सोशल मीडियाद्वारे जर्सीला बरचं ट्रोल केलं असून आता पाकिस्तानचाच माजी खेळाडू दानिश कनेरियानेही (Danish Kaneria) ''ही जर्सी घालून खेळाडू मैदानात उभे नाही तर फळांच्या दुकानात उभे असल्यासारखे दिसतील.'' अशी प्रतिक्रिया देत जर्सीची खिल्ली उडवली आहे.

एकिकडे सर्वच क्रिकेट फॅन्स या जर्सीबाबत विविध मजेशीर मीम्स शेअर करत आहेत. भारतातीलच नाही तर पाकिस्तानातील फॅन्सही या जर्सीची खिल्ली उडवत असताना माजी पाकिस्तानी क्रिकेटर दानिश कनेरिया म्हणाला आहे,''खरंच पाकिस्तान संघाची ही जर्सी कलिंगडाप्रमाणे दिसत आहे. एक व्हिडीओ गेम आहे 'फ्रुट निंजा'. ज्यामध्ये तुम्हाला फळं कापयची असतात, यातीलच खरबूज आणि कलिंगड फळांप्रमाणेच ही जर्सी तयार केली आहे. ही पाहून खेळाडू मैदानात नाही तर फळांच्या दुकानावर आहेत, असं दिसून येत आहे.''

View this post on Instagram
 
A post shared by Circle of Cricket (@circleofcricket)

सोशल मीडियावरुन लॉन्च केली जर्सी

टीम इंडियाने 18 सप्टेंबरला आपली जर्सी लॉन्च केल्यानंतर लगेचच 19 सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघानेही आपली जर्सी समोर आणली. पीसीएलमधील संघ इस्लामाद युनायटेडच्या ट्वीटर हँडलवरही या जर्सीचे फोटो असून जर्सी समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या जर्सीचे फोटो शेअर केले. पाकिस्तान टीमने जर्सी लॉन्च केल्यानंतर खेळाडूं नवी जर्सी घातलेले फोटोही शेअर करण्यात आले. यामध्ये कर्णधार बाबर आझम तसंच युवा गोलंदाज नसीम शाह, अष्टपैलू शादाब खान यांच्यासह महिला खेळाडूही दिसत आहेत. पाकिस्तान संघ हीच जर्सी घालून स्पर्धेत उतरणार असून पहिला सामना भारताविरुद्ध असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 26 ऑक्टोबररोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मैदानात खेळवला जाणार आहे.  

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
RCB vs KKR : आरसीबीला सूचक इशारा देत रिंकू सिंगनं वातावरण तापवलं, फोटो पोस्ट करत दिलं चॅलेंज
कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीला रिंकूचा इशारा, मॅचपूर्वी न बोलताच सगळं सांगितलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chandrakant Khaire : Ambadas Danve आणि मी हातात हात घालून प्रचार करणार : चंद्रकांत खैरेShriniwas Patil Loksabha : श्रीनिवास पाटलांची लोकसभा निवडणुकीतून माघार!Chhatrapati Sambhajinagar Rada : संभाजीनगरमध्ये बाळू औतांडेंकडून विक्की राजे पाटलांना मारहाणPrakash Ambedkar : वसंत मोरेंनी पुण्यात मागितला आंबेडकरांचा पाठिंबा, दोन ते चार दिवसांत निर्णय-मोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Kalyan Loksabha : कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
कल्याणमध्ये उद्धव ठाकरे कोणता डाव टाकणार? मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलावलं!
Jyoti Mete : ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या, उमेदवारीवर काय निर्णय झाला?
ज्योती मेटे शरद पवार गटातील प्रवेशावर काय म्हणाल्या; बीडमधून उमेदवारीवर कोणता निर्णय झाला?
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
RCB vs KKR : आरसीबीला सूचक इशारा देत रिंकू सिंगनं वातावरण तापवलं, फोटो पोस्ट करत दिलं चॅलेंज
कोहली आणि फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीला रिंकूचा इशारा, मॅचपूर्वी न बोलताच सगळं सांगितलं
Mirzapur 3 Release Date : कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
कालीन भैय्या-गुड्डू पंडित भिडणार! 'मिर्जापुर 3'च्या रिलीज डेटवर निर्मात्यांनी दिली अपडेट
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Embed widget