Team India: अक्षर पटेल की आर अश्विन, रोहित शर्मा कोणाला निवडणार? पाकिस्तानविरुद्ध असा असेल भारताचा संभाव्य संघ
ICC T20 World Cup 2022: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं टी-20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे.
ICC T20 World Cup 2022: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं टी-20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ज्या प्रकारे ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांच्यातील एक यष्टीरक्षक फलंदाज निवडणं अत्यंत अवघड ठरतंय, त्याच पद्धतीनं अक्षर पटेल (Axar Patel) आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांच्यातील एक खेळाडू निवडणं संघ व्यवस्थापनासाठी सोपं नसेल.
भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्मासह केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दीक पांड्या यांची जागा निश्चित आहे. सध्या ऋषभ पंतच्या तुलनेत दिनेश कार्तिकचं नाव अग्रेसर आहे. पंत भारतीय फलंदाजी फळीतील अव्वल सहामध्ये एकमेव डावखुरा फलंदाज आहे, अशात जर कार्तिक आणि पंत दोघेही संघात सामील झाले. तर, रोहितला पांड्याला पाचवा गोलंदाजी पर्याय म्हणून वापरावं लागेल, जे अनेकदा संघासाठी चिंतेचा विषय ठरलाय.
पाकिस्तानविरुद्ध अक्षर पटेलला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी
ऋषभ पंत सारखीच अक्षर पटेलचीही स्थिती आहे. अक्षर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चांगली गोलंदाजी केलीय. पाकिस्तानच्या संघात झमान, मोहम्मद नवाज आणि खुशदिल शाह यांसारख्या डावखुरे फलंदाज आहेत, ज्यांच्या उपस्थितीत डावखुऱ्या गोलंदाजाला खेळवणं धोकादायक ठरू शकते.
आर.अश्विनचा अनुभव फायद्याचा ठरण्याची शक्यता
भारताचा फिरकीपटू आर.अश्विन भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज आहे. ज्यामुळं त्याच्याकडंही दुर्लक्षित केलं जाऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियाच्या भल्यामोठ्या मैदानावर युजवेंद्र चहल हा संघाचा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू असेल. याचबरोबर सुरूवातीच्या षटकात भारताला विकेट्स मिळवून देणारा अर्शदीप सिंह आणि मोहम्मद शामी यांची जागा जवळपास निश्चित मानली जात आहे. हर्षल पटेलबाबत संघ व्यवस्थापन काय निर्णय घेतो? हे लवकरच स्पष्ट होईल.
पाकिस्तानविरुद्ध कशी असेल भारताची प्लेईंग इलेव्हन?
रोहित शर्मा (कर्णधार) केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-