एक्स्प्लोर

AUS vs IRE, T20 World Cup 2022 : लॉर्कनची एकहाती झुंज व्यर्थ, अखेर ऑस्ट्रेलियाचा आयर्लंडवर 42 धावांनी विजय

AUS vs IRE : ऑस्ट्रेलियाच्या गाबा मैदानात यजमान संघ ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात आज सामना पार पडला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 42 धावांनी आयर्लंडवर विजय मिळवला.

AUS vs IRE, T20 World Cup 2022 : अखेरपर्यंत लढणं काय असतं, हे नुकत्याच पार पडलेल्या आयर्लं विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ireland vs Australia) सामन्यात आयर्लंडचा फलंदाज लॉर्कन टकर (Lorcan Tucker) याने दाखवून दिलं. लॉर्कनने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला जिंकवून देण्याचा संपूर्ण प्रयत्न केल्या, पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर आयर्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून 42 धावांनी पराभव झाला. टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड संघ आमने-सामने होते. यावेळी आधी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने 180 धावाचं लक्ष्य आयर्लंडला दिलं होतं, ते पार करताना आयर्लंडचा संघ 137 धावाच करु शकला. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 42 धावांनी विजयी झाला.

आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा होता. कारण आयर्लंडची (Ireland Team) स्थितीही ऑस्ट्रेलियाप्रमाणेच होती. दोघांनी एक सामना जिंकला असून एक गमावत एक सामना अनिर्णीत राहिला होता. पण नेट रनरेटच्या जोरावर ते ऑस्ट्रेलियाच्या पुढे होता. पण आता ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत 5 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तसंच कांगांरुनी सेमीफायनलच्या (T20 World Cup Semifinal Scenario) दिशेने यशस्वी पाऊल देखील टाकलं आहे. सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत आयर्लंड संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. आयर्लंड संघाने गोलंदाजीही चांगली केली. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरॉन फिंचने 63 धावांची झुंज देत संघाला एक दमदार धावसंख्या करुन दिली. स्टॉयनीसनेही 35 धावा केल्या. ज्यामुळे 20 षटकांत ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स गमावत 179 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.

180 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या आयर्लंडला सुरुवातीपासून झटके बसत होते. एकाही फलंदाजाला टिकून खेळता येत नव्हता. पण यष्टीरक्षक फलंदाज लॉर्कन टकर याने सुरुवातीपासून अखेपर्यंत टिकून राहून नाबाद 71 धावा केल्या, पण त्याला साथ न मिळाल्याने अखेर आयर्लंडचा ऑस्ट्रेलियाकडून 42 धावांनी पराभव झाला. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स, झाम्पा, स्टार्क आणि मॅक्सवेलने प्रत्येकी 2 तर स्टॉयनिसने 1 विकेट घेतली.ऑस्ट्रेलियन कर्णधार आरॉन फिंचला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतोAjit Pawar On Indian Cricket Team:सूर्या तुला आम्ही सगळ्यांनी बघितला असता, अजितदादांकडून कॅचचं कौतुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अभिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
Embed widget