T20 World Cup : 16 संघ, 45 मैदानं, ऑस्ट्रेलियात रंगणार टी 20 चा थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
T20 World Cup 2022 : टी 20 विश्वचषकाचा थरार 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह 16 संघ मैदानात उतरणार आहेत. 45 मैदानावर विश्वचषकाची रणधुमाळी रंगणार आहे.
T20 World Cup 2022 News : ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 विश्वचषकाचा थरार 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह 16 संघ मैदानात उतरणार आहेत. 45 मैदानावर विश्वचषकाची रणधुमाळी रंगणार आहे. भारत 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात विश्वचषकाची सुरुवात करणार आहे. क्वालिफायर सामने 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. तर सुपर 12 चे सामने 22 ऑक्टोबरपासून रंगणार आहेत.
लाइव्ह ब्रॉडकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे पाहाल?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर T20 वर्ल्ड कप 2022 चे सामने लाईव्ह पाहाता येणार आहेत. तर हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे टीम इंडियाचे सामने तसेच सेमीफायनल आणि फायनल सामना दूरदर्शनवर लाईव्ह पाहाता येणार आहेत.
क्वालिफायर सामने कोणते संघ खेळणार?
आठ संघ क्वालिफायर सामने खेळणार आहेत. या संघांना दोन गटात विभागण्यात आले आहे. यामधील अव्वल चार संघ सुपर-12 मध्ये पोहचणार आहेत. श्रीलंका आणि वेस्टविंडीज यासारखे संघही क्वालिफायर खेळणार आहेत.
ग्रुप-A:
नेदरलँड्स, श्रीलंका, यूएई, नामीबिया
ग्रुप-B:
आयरलँड, वेस्टविंडीज, स्कॉटलँड, झिम्बाब्वे
सुपर-12 साठी 12 संघांना दोन गटात ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.
ग्रुप-1 : इंग्लंड, न्यूजीलंड, ऑस्ट्रेलिया, अफगानिस्तान, ग्रुप-A विजेता, ग्रुप-B उपविजेता
ग्रुप-2 : भारत, पाकिस्तान, दक्षिण अफ्रीका, बांगलादेश, ग्रुप-A उपविजेता, ग्रुप-B विजेता
भारतीय संघाचे साखळी फेरीतील सामने -
23 ऑक्टोबर पाकिस्तान मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
27 ऑक्टोबर A2 सिडनी दुपारी 12.30 वाजता
30 ऑक्टोबर दक्षिण अफ्रीका पर्थ संध्याकाळी 4.30 वाजता
2 नोव्हेंबर बांगलादेश अॅडिलेड दुपारी 1.30 वाजता
6 नोव्हेंबर B1 मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
क्वालिफायर सामने कधी आणि कुठे?
16 ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध नामीबिया - 9:30 वाजता - कार्दिनिया पार्क, जिलॉन्ग
16 ऑक्टोबर - नेदरलँड विरुद्ध यूएई - दुपारी 1:30 वाजता - कार्दिनिया पार्क, जिलॉन्ग
17 ऑक्टोबर - वेस्टविंडीज विरुद्ध स्कॉटलँड - सकाळी 9:30 वाजता - बेलेरिव ओवल, होबार्ट
17 ऑक्टोबर - आयरलँड विरुद्ध झिम्बाब्वे - दुपारी 1:30 वाजता - बेलेरिव ओवल, होबार्ट
18 ऑक्टोबर - नामीबिया विरुद्ध नीदरलँड - 9:30 - कार्दिनिया पार्क, जिलॉन्ग
18 ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध यूएई - दुपारी 1:30 वाजता - कार्दिनिया पार्क, जिलॉन्ग
19 ऑक्टोबर - स्कॉटलँड विरुद्ध आयरलँड - सकाळी 9:30 वाजता - बेलेरिव ओवल, होबार्ट
19 ऑक्टोबर - वेस्टविंडीज विरुद्ध झिम्बाब्वे -1:30 वाजता - बेलेरिव ओवल, होबार्ट
20 ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध नीदरलँड - सकाळी 9:30 - कार्दिनिया पार्क, जिलॉन्ग
20 ऑक्टोबर - नामीबिया विरुद्ध संयुक्त अरब अमीरात - दुपारी 1:30 - वाजता - कार्दिनिया पार्क, जिलॉन्ग
21 ऑक्टोबर - वेस्टविंडीज विरुद्ध आयरलँड- सकाळी 9:30 वाजता - बेलेरिव ओवल, होबार्ट
21 ऑक्टोबर - स्कॉटलँड विरुद्ध झिम्बाब्वे - दुपारी 1:30 वाजता - बेलेरिव ओवल, होबार्ट
ग्रुप-1 मधील सामने
22 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूजीलंड - दुपारी 12:30 वाजता - एससीजी, सिडनी
22 ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध अफगानिस्तान - सांयकाळी 4:30 वाजता - पर्थ स्टेडियम
23 ऑक्टोबर - A1 विरुद्ध B2 - 9:30 वाजता - बेलेरिव ओवल, होबार्ट
25 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध ए1 - सांयकाळी 4:30 वाजता - पर्थ स्टेडियम
26 ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध बी 2 - 9:30 दुपारी - एमसीजी, मेलबर्न
26 ऑक्टोबर - न्यूजीलंड विरुद्ध अफगानिस्तान - दुपारी 1:30 वाजता - एमसीजी, मेलबर्न
28 ऑक्टोबर - अफगानिस्तान विरुद्ध बी 2 - 9:30 वाजता - एमसीजी, मेलबर्न
28 ऑक्टोबर - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया - दुपारी 1:30 वाजता - एमसीजी, मेलबर्न
29 ऑक्टोबर - न्यूजीलंड विरुद्ध ए1 - दुपारी 1:30 वाजता - एससीजी, सिडनी
31 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बी 2 - दुपारी 1:30 वाजता - गाबा, ब्रिस्बेन
1 नोव्हेंबर - अफगानिस्तान विरुद्ध ए1 - 9:30 वाजता - गाबा, ब्रिस्बेन
1 नोव्हेंबर - इंग्लंड विरुद्ध न्यूजीलंड- दुपारी 1:30 वाजता - गाबा, ब्रिस्बेन
नोव्हेंबर 4 - न्यूजीलंड विरुद्ध बी 2 - 9:30 वाजता - एडिलेड ओवल, एडिलेड
नोव्हेंबर 4 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान - दुपारी 1:30 वाजता - एडिलेड ओवल, एडिलेड
5 नोव्हेंबर - इंग्लंड विरुद्ध ए1 - दुपारी 1:30 वाजता - एससीजी, सिडनी
ग्रुप-2 मधील सामने -
23 ऑक्टोबर - भारत विरुद्ध पाकिस्तान - दुपारी 1:30 वाजता - एमसीजी, मेलबर्न
24 ऑक्टोबर - बांगलादेश विरुद्ध ए2 - 9:30 वाजता - बेलेरिव ओवल, होबार्ट
24 ऑक्टोबर - दक्षिण अफ्रीका विरुद्ध बी1 - दुपारी 1:30 वाजता - बेलेरिव ओवल, होबार्ट
27 ऑक्टोबर - दक्षिण अफ्रीका विरुद्ध बांग्लादेश - सकाळी 8:30 वाजता - एससीजी, सिडनी
27 ऑक्टोबर - भारत विरुद्ध ए2 - दुपारी 12:30 वाजता - एससीजी, सिडनी
27 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध बी1 - सायंकाळी 4:30 वाजता - पर्थ स्टेडियम, पर्थ
ऑक्टोबर 30 - बांग्लादेश विरुद्ध बी 1 - 8:30 वाजता - गाबा, ब्रिस्बेन
30 ऑक्टोबर - पाकिस्तान विरुद्ध ए2 - दुपारी 12:30 वाजता - पर्थ स्टेडियम, पर्थ
30 ऑक्टोबर - भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका - सायंकाळी 4:30 वाजता - पर्थ स्टेडियम, पर्थ
2 नोव्हेंबर - बी1 विरुद्ध ए2 - 9:30 वाजता - एडिलेड ओवल, एडिलेड
2 नोव्हेंबर - भारत विरुद्ध बांग्लादेश - दुपारी 1:30 वाजता - एडिलेड ओवल, एडिलेड
3 नोव्हेंबर - पाकिस्तान विरुद्ध दक्षिण अफ्रीका - दुपारी 1:30 वाजता - एससीजी, सिडनी
नोव्हेंबर 6 - दक्षिण अफ्रीका विरुद्ध ए 2 - 5:30 वाजता - एडिलेड ओवल, एडिलेड
6 नोव्हेंबर - पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश - सकाळी 9:30 - एडिलेड ओवल, एडिलेड
6 नोव्हेंबर - भारत विरुद्ध बी1 - दुपारी 1:30 वाजता - एमसीजी, मेलबर्न
नॉकआउट सामने-
9 नोव्हेंबर - सेमीफायनल 1 - दुपारी 1:30 वाजता - एससीजी, सिडनी
10 नोव्हेंबर - सेमीफायनल 2 - दुपारी 1:30 वाजता - एडिलेड ओवल, एडिलेड
13 नोव्हेंबर - फायनल- दुपारी 1:30 वाजता - एमसीजी, मेलबर्न