World Cup 2023 : ...तर 2023 चा विश्वचषक भारतात होणार नाही? जाणून घ्या काय आहे कारण
World Cup 2023 : विश्वचषकाच्या इतिहासात संपूर्णपणे प्रथमच भारताला याचे यजमानपद मिळणार आहे. 1987, 1996 आणि 2011 हे तीन विश्वचषक सामने भारताने संयुक्तपणे आयोजित केले होते.
World Cup 2023 : आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषक 2023 चे सामने भारतात होणार आहेत. परंतु, आता भारताचे यजमानपद धोक्यात आले आहे. आयसीसीने भारतात 2023 विश्वचषक आयोजित करण्यासाठी करात सूट मागितली आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला भारत सरकारशी चर्चा करावी लागणार आहे. देशातील अशा कार्यक्रमांना भारत सरकार कर सूट देत नाही. यापूर्वी 2016 च्या विश्वचषक स्पर्धेतही बीसीसीआयला अशाच समस्येला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे 2023 च्या विश्वचषक आता भारतात होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ICC ने BCCI ला वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनासाठी टॅक्समध्ये सूट मागितली आहे. यासाठी बीसीसीआयला भारत सरकारला विनंती करावी लागेल. परंतु, हे सर्व खूप अवघड असणार आहे. कारण यापूर्वी बीसीसीआयला टी-20 वर्ल्ड कप 2016 साठीही कर सूट मिळू शकली नव्हती. त्यावेळी बीसीसीआयकडून आयसीसीला 190 कोटी रुपये द्यावे लागले होते. हे त्यांचे मोठे नुकसान होते. आता पुन्हा एकदा तीच परिस्थिती समोर आली आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषक स्पर्धा आयोजित करणाऱ्या देशाला आपल्या सरकारशी बोलून कर सूट मिळवावी लागते. T20 विश्वचषक 2016 मध्ये देखील बीसीसीआयला अशाच समस्येला सामोरे जावे लागले होते आणि आता पुन्हा एकदा गंभीर समस्येचा सामना करावा लागला आहे. जर बीसीसीआयला भारत सरकारकडून करसवलत मिळू शकली नाही तर आयसीसीला सुमारे 900 कोटी रुपये द्यावे लागतील. तसे न झाल्यास विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही भारताकडून हिसकावले जाऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती किंवा कोणाकडून वक्तव्य आलेले नाही.
World Cup 2023 : पहिल्यांदाच भारताला संधी
विश्वचषकाच्या इतिहासात संपूर्णपणे प्रथमच भारताला याचे यजमानपद मिळणार आहे. 1987, 1996 आणि 2011 हे तीन विश्वचषक सामने भारताने संयुक्तपणे आयोजित केले होते. तर 2023 मध्ये हा विश्वचषक सामना एक दिवसीय फॉरमॅटमध्ये म्हणजेच 50 षटकांमध्ये खेळायला जाणार आहे. 2023 मध्ये नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या