एक्स्प्लोर
'2003 च्या विश्वचषकात धोनी आमच्यासोबत हवा होता'
'ए सेंच्युरी इज नॉट इनफ' या आपल्या आत्मचरित्रात टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2003चा विश्वचषकात धोनी आपल्या संघात हवा होता. असं गांगुलीला कायम वाटतं.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ घडवण्यात माजी कर्णधार सौरव गांगुलीचा मोठा वाटा आहे. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने 2003 च्या विश्वचषकाच्या फायनलपर्यंत धडक मारली होती. मात्र, त्याला विश्वचषक मिळवून देण्यात अपयश आलं. ही खंत त्याच्या मनात कायमच आहे. इतक्या वर्षानंतरही गांगुलीला तो पराभव लक्षात आहे.
'ए सेंच्युरी इज नॉट इनफ' या आपल्या आत्मचरित्रात गांगुलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2003चा विश्वचषकात धोनी आपल्या संघात हवा होता. असं गांगुलीला कायम वाटतं. त्याने आपल्या पुस्तकात तसं नमूदही केलं आहे. '2003 च्या विश्वचषकात धोनी आमच्यासोबत हवा होता. जेव्हा मला माहित पडलं की, आम्ही 2003 चा विश्वचषकाची फायनल खेळत होतो तेव्हा धोनी रेल्वेत टीसी म्हणून काम करत होता. ही खरंच अविश्वसनीय गोष्ट आहे.'
पण विश्वचषकाच्या एका वर्षानंतरच गांगुलीची ती इच्छा पूर्ण झाली. त्याच्याच नेतृत्त्वात धोनी भारतीय संघाचा सदस्य बनला. गांगुलीने आपल्या पुस्तकात असंही लिहलं आहे की, 'मी मागील अनेक वर्षापासून अशा खेळाडूंवर नजर ठेऊन होतो की, जे दबावातही आपला खेळ दाखवू शकतील. असे खेळाडू ज्यांच्यात सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता असेल. महेंद्रसिंह धोनीला मी पहिल्यांदा 2004 साली पाहिलं. मी ज्यापद्धतीने विचार करत होतो तशा पद्धतीने खेळणारा तो खेळाडू होता. धोनीला पाहताच मी प्रभावित झालो होतो.'
'आज मी खुश आहे की, माझा अंदाज अचूक होता. एवढ्या संकटांचा सामना करुन तो आज ज्या यशोशिखरावर पोहचला आहे ते खरंच कौतुकास्पद आहे.' असंही गांगुलीने या पुस्तकात लिहलं आहे.
धोनीच्य आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात म्हणावी तशी झाली नव्हती. पहिल्याच सामन्यात त्याला शून्यावर बाद व्हावं लागलं होतं. त्यानंतरच्या सामन्यातही त्याला फारशी चमक दाखवता आली नव्हती. पण त्यानंतरच्या सामन्यात जेव्हा गांगुलीने त्याला वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय घेतला तेव्हा धोनीने शानदार शतक झळकावून गांगुलीचा विश्वास सार्थ ठरवला.
धोनीने गांगुलीच्या नेतृत्वाखाली 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणं सुरु केलं. तर 2008 साली गांगुलीने धोनीच्या नेतृत्वात आपल्या कारकीर्द संपवली. त्यामुळे धोनीच्या आजवरच्या यशात गांगुलीचाही मोलाचा वाटा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बीड
बीड
बीड
Advertisement