एक्स्प्लोर

द. आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात कोहली कोणाला संधी देणार?

या सामन्याच्या निमित्तानं भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला विश्रांती देऊन, टीम इंडिया मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरला खेळवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सेन्चुरियन : विराट कोहलीच्या टीम इंडियानं पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचा इतिहास घडवला. याच पार्श्वभूमीवर भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आज सहाव्या वन डे सामन्यासाठी आमनेसामने येणार आहेत. हा सामना सेन्चुरियनच्या सुपरस्पोर्टस पार्कवर खेळवण्यात येईल. भारतानं पाचवी वन डे जिंकून, मालिकेत ४-१ अशी आधीच खिशात घातली आहे. त्यामुळं टीम इंडियानं आयसीसीच्या वन डे क्रमवारीत नंबर वनवर झेप घेतली. या नंबर वनचा लौकिक राखण्यासाठी आणि मालिकेवरचं आपलं वर्चस्व पुन्हा दाखवून देण्यासाठी टीम इंडिया सहावी वन डेही जिंकण्याचा नेटानं प्रयत्न करेल. या सामन्याच्या निमित्तानं भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराला विश्रांती देऊन, टीम इंडिया मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूरला खेळवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या संपूर्ण मालिकेत टीम इंडियांच्या पहिल्या तीन फलंदाजांनी सुरुवात चांगली करुन दिली असली तरी मधल्या फळीतल्या फलंदाजांना म्हणावा तसा सूर अद्यापही सापडलेला नाही. अंजिक्य रहाणे, हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनी यांनी मालिकेत फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. त्यामुळे आता कर्णधार कोहली प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल करणार का? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे. शेवटच्या सामन्यात दिनेश कार्तिक, मनिष पांडे, केदार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजांमध्येही काही जणांना संधी मिळू शकते. दुसरीकडे मालिका गमावलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ शेवटचा सामना जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करेल. त्यामुळे या सामन्यासाठी ते देखील संघात काही बदल करु शकतात. भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर. दक्षिण अफ्रिका : एडिन मार्करम (कर्णधार), हाशिम अमला, एबी डिविलियर्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), ज्यां पॉल ड्यूमिनी, फरहान बेहरदीन, इमरान ताहिर, हेइनरिक क्लासेन, डेविड मिलर, मोर्ने मोर्कल, क्रिस मौरिस, लुंगी एन्गिडी, आंदिले फेहुलकवायो, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, खायो जोंडो.

महत्त्वाच्या बातम्या

Yuzvendra Chahal : क्रिकेटच्या मैदानानंतर युजवेंद्र चहलची राजकारणात धमाकेदार एन्ट्री! थेट भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चामध्ये 'ही' मोठी जबाबदारी
क्रिकेटच्या मैदानानंतर युजवेंद्र चहलची राजकारणात धमाकेदार एन्ट्री! थेट भाजपमध्ये प्रवेश; ओबीसी मोर्चामध्ये 'ही' मोठी जबाबदारी
IND vs PAK Asia Cup : पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने! मैदान सज्ज, महामुकाबल्याची वेळ ठरली, घरबसल्या कोणत्या चॅनेलवर IND vs PAK LIVE सामना पाहाल? जाणून घ्या A टू Z
Khashaba Jadhav News : मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
मोठी बातमी : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधवांचा पद्म पुरस्कार नजरेच्या टप्प्यात, हायकोर्टाकडून दखल, सरकारला निर्देश धाडले!
Sarfaraz Khan News : पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?
पत्नी रडत होती, वडीलही खचले होते, त्यात गंभीरचा मध्यरात्री फोन आला अन्...; सरफराजचा मोठा खुलासा, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
Embed widget