एक्स्प्लोर
VIDEO: भर मैदानातच आर. अश्विनचा तोल सुटला!

चेन्नई: तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये टीम इंडियाचा अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनचं रौद्ररुप पाहायला मिळालं. डिंडीगुल ड्रॅगन्स आणि चेपॉक सुपर गिलिज संघांमधल्या सामन्यात अश्विन आणि साई किशोर यांच्यात हमरीतुमरी झाली. डिंडीगुल ड्रॅगन्सला विजयासाठी 173 धावांची आवश्यकता होती. एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डिंडीगुलचा फलंदाज जगदिशन आऊट झाला. त्यावेळी साई किशोर आनंद व्यक्त करत होता. बाद झालेल्या जगदीशनला ते पाहवलं नाही आणि तो थेट साई किशोरच्या अंगावर धावून गेला. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्याच दरम्यान आर. अश्विनचाही ताबा सुटला आणि तो साई किशोरसोबत वाद घालू लागला. अश्विनचं हे रुप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. VIDEO:
आणखी वाचा























