Team India T-20 World Cup : वनडे वर्ल्डकप थोडक्यात गेला, पण टी-20 वर्ल्डकपसाठी सहा महिन्यात 'या' 5 प्रश्नांची उत्तरे शोधावीच लागणार!
Team India T 20 World Cup : टी-20 विश्वचषकाबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
Team India T 20 World Cup : T-20 विश्वचषक 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. आगामी T20 विश्वचषक जून महिन्यात वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. T20 विश्वचषक 2024 पूर्वी भारताला आता फक्त पाच T20 सामने खेळायचे आहेत, ज्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेचाही समावेश आहे. यासोबतच इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चेही आयोजन केले जाणार आहे ज्यामध्ये भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार कोण? (Team India T 20 World Cup Caption)
टी-20 विश्वचषकाबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व कोण करणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा अधिकृत कर्णधार असू शकतो, परंतु त्याने वर्षभरापासून एकही T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. रोहितचा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध होता. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनाही टी-20 विश्वचषकातील कर्णधारपदाबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी अस्पष्ट उत्तर दिले.
गेल्या T20 विश्वचषकापासून हार्दिक पांड्याने बहुतांश सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. मात्र, हार्दिकला पुन्हा दुखापत झाली असून त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित, सूर्या आणि हार्दिक यांच्यापैकी एकाला टी-२० विश्वचषकात कर्णधारपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
विराट कोहली खेळणार T20 विश्वचषक? (Virat Kohli in T 20 World Cup or not)
स्टार फलंदाज विराट कोहली आगामी T20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार की नाही हाही मोठा प्रश्न आहे. 35 वर्षीय विराट कोहलीने 10 नोव्हेंबर 2022 रोजी अॅडलेड येथे इंग्लंड विरुद्ध भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता, जो T20 विश्वचषक 2022 चा उपांत्य सामना होता. कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 मधील जगातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे.
कोहलीने 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 52.73 च्या सरासरीने आणि 137.96 च्या स्ट्राईक रेटने 4008 धावा केल्या आहेत. विराटच्या नावावर या फॉरमॅटमध्ये 1 शतक आणि 37 अर्धशतके आहेत. कोहलीने टी-20 विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होईल. कोहलीने नुकत्याच झालेल्या क्रिकेट विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती आणि 11 सामन्यात 765 धावा केल्या होत्या.
ओपनिंग स्लॉटसाठी अनेक दावेदार (T 20 World Cup Team India Opener)
विश्वचषकापूर्वी सर्वात मोठा संघर्ष ओपनिंग कॉम्बिनेशनचा आहे. T20 विश्वचषक 2024 मधील ओपनिंग स्लॉटसाठी कोणत्या भारतीय खेळाडूंची नावे निश्चित केली जातात हे पाहणे मनोरंजक असेल. मात्र, रोहित शर्माशिवाय यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड हेही सलामीच्या स्थानासाठी शर्यतीत आहेत. यशस्वी-ऋतुराज यांनी ऑस्ट्रेलिया मालिकेत चांगली कामगिरी केली होती. आगामी टी-20 सामन्यांमध्ये त्यांची कामगिरी चांगली राहिली, तर निवडकर्त्यांना बरंच कोडं सोडवावं लागेल.
बिष्णोईने दावा पक्का केला (Ravi Bishnoi)
शमीचे T20 भविष्य काय असेल? (Mohammed Shami in T 20 World Cup or not)
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकत्याच झालेल्या क्रिकेट विश्वचषकात संस्मरणीय कामगिरी केली होती. मोहम्मद शमीने क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये एकूण सात सामने खेळले आणि 24 बळी घेतले. या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज होता. शमी वनडे फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे, मात्र तो बऱ्याच दिवसांपासून टी-20 संघाबाहेर आहे. शमीने शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना गेल्या वर्षीच्या विश्वचषकात खेळला होता. मुकेश कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान यासारखे वेगवान गोलंदाज लहान फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. अशा परिस्थितीत शमीची टी-20 विश्वचषक संघात निवड होणे कठीण दिसते.
इतर महत्वाच्या बातम्या