एक्स्प्लोर
Advertisement
Pulwama terror attack : विश्वचषकात भारताने पाकिस्तानसोबत खेळावं की नाही, विराट म्हणतो....
पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. शिवाय पाकिस्तानसोबतचे सगळेच संबंध तोडण्याची मागणी होत आहे.
मुंबई : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर आगामी क्रिकेट विश्वचषकात भारताने पाकिस्तानसोबत न खेळण्याच्या मागणीवर भारतीय कर्णधार विराट कोहलीने मौन सोडलं आहे. या संदर्भात जो काही निर्णय घेतला जाईल, तो आम्हाला मंजूर असेल, असं विराट कोहली म्हणाला. विशाखापट्टणमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी होणाऱ्या पहिल्या टी20 सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत कोहली बोलत होता.
विश्वचषक सामन्यावर बहिष्कार घालून पाकला विजयाचे आयते गुण का द्यायचे? : सचिन तेंडुलकर
विराट कोहली म्हणाला की, "पुलवामा हल्ला ही अतिशय दु:खद घटना होती. या परिस्थितीत आम्ही देशासोबत आहोत. शहीद जवानांना कुटुंबीयांचं मी आणि माझा संघ सांत्वन करतो. यासंदर्भात (पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत) सरकार आणि बीसीसीआय जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल."
पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत. शिवाय पाकिस्तानसोबतचे सगळेच संबंध तोडण्याची मागणी होत आहे. सोबतच विश्वचषकात पाकिस्तानविरोधात 16 जून रोजी मॅन्चेस्टरमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणीही जोर धरु लागली आहे. पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर काढा, बीसीसीआय आयसीसीला पत्र लिहिणार राजकीय स्वार्थासाठी क्रिकेटला लक्ष्य : पाकिस्तानी कर्णधार "भारतात राजकीय स्वार्थासाठी क्रिकेटला लक्ष्य केले जात आहे," प्रतिक्रिया पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमदने या प्रकरणावर दिली. "भारत आणि पाकिस्तान यांच्यातला विश्वचषकातला सामना आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार खेळवायला हवा. जगभरातील कोट्यवधी प्रेक्षक या सामन्याची वाट पाहत आहेत. राजकीय फायद्यासाठी क्रिकेटला लक्ष्य करणे योग्य नाही. क्रिकेट हा खेळ आहे, त्यामुळे भारताने खिलाडूवृत्तीने हा खेळ खेळावा. परंतु भारतात मात्र यावरुन राजकारण केलं जात आहे. पाकिस्तानमध्ये असं होत नाही. पाकिस्तानमध्ये राजकीय लोकांकडून खेळात हस्तक्षेप केला जात नाही. भारतात दोन गट भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावरुन भारतीय नागरिक, राजकारणी आणि माजी क्रिकेटर दोन गटात विभागले गेले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंह यांच्या म्हणण्यानुसार भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये. तर दुसऱ्या बाजूला महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्या मते भारत जर पाकिस्तानविरोधात सामना खेळला नाही. तर पाकिस्तानला फुकटचे दोन गुण मिळतील आणि आपले वजा होतील. त्यापेक्षा भारताने हा सामना खेळावा, पाकिस्तानला हरवावं आणि गुणही मिळवावेत. पाकिस्तानला हरवण्यात वेगळीच मजा आहे. निवडणूक लढवण्यासाठी गांगुली पब्लिसिटी स्टंट करतोय : जावेद मियाँदाद पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आलं होतं. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल 200 किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.#WATCH Virat Kohli on Ind Vs Pak in World Cup says, "Our sincere condolences to the families of CRPF soldiers who lost their lives in #PulwamaAttack. We stand by what the nation wants to do and what the BCCI decides to do." pic.twitter.com/gjyJ9qDxts
— ANI (@ANI) February 23, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement