Video | पहिल्याच जाहिरातीत स्टार खेळाडूसह झळकली धोनीची मुलगी झिवा
झिवा चक्क जाहिरातीतून झळकली आहे. इथं तिला एका स्टार खेळाडूसह स्क्रीन शेअर करण्याची संधीही मिळाली आहे. निमित्तानं झिवानं खऱ्या अर्थानं कॅमेऱ्यासमोर आपल्या अभिनयाचीही झलक दाखवली आहे.

मुंबई : सेलिब्रिटी जितके चर्चेत असतात तितकीच चर्चा त्यांच्या मुलांचीही होते. कलाकार मंडळींप्रमाणंच खेळाडूंची मुलंही यात मागे नाहीत. खेळाडूंच्या मुलांची नावं सांगायची झाल्यास त्यात (Ms Dhoni) महेंद्र सिंह धोनी याच्या मुलीचं नाव अग्रस्थानी येतं असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर डिझायनंर कपडे घालून अनोख्या अंदाजात नेटकऱ्यांची मनं जिंकणं असो, किंवा मग एखाद्या व्हिडीओतून माहिलाही टक्कर देणं असो, झिवा कायमच लक्ष वेधते.
आता हिच झिवा चक्क जाहिरातीतून झळकली आहे. इथं तिला एका स्टार खेळाडूसह स्क्रीन शेअर करण्याची संधीही मिळाली आहे. ओरिओ, या बिस्कीटाच्या जाहिरातीच्या निमित्तानं झिवानं खऱ्या अर्थानं कॅमेऱ्यासमोर आपल्या अभिनयाचीही झलक दाखवली आहे. बरं, सोबत झळकणाऱ्या स्टार खेळाडूलाही तिनं चांगलीच टक्करही दिली आहे.
झिवासोबत झळकलेला हा स्टार खेळाडू आहे तरी कोण, असाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना? तर, झिवासह ओरिओच्या जाहिरातीत झळकणारा हा खेळाडू आहे, खुद्द महेंद्र सिंह धोनी. अवघ्या पाच वर्षांच्याच वयात धोनीच्या लेकिनं, अर्थात झिवानं तिच्या अभिनयानं वडिलांनाही चांगलीच टक्कर दिली आहे.
View this post on Instagram
एरव्ही ज्याप्रमाणं माही आणि त्याच्या लेकिचं नातं सर्वांना पाहायला मिळतं, त्याच गोड नात्याची झलक या जाहिरातीतही पाहायला मिळत आहे. ओरिओ इंडियाच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ही जाहिरात शेअर करण्यात आली असून, त्या माध्यमातून माहिनं आणि त्याच्या मुलीनं जाहिरातीसाठी योगदान दिल्याची बाब स्पष्ट केली आहे. वडील- मुलीची ही जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये असून, झिवाचा अभिनय पाहून नेटकरीही क्या बात! अशीच प्रतिक्रिया देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
