एक्स्प्लोर

सेहवाग आणि ब्रिटीश पत्रकार मॉर्गन पुन्हा भिडले

मुंबई: गेल्या शनिवारी इराणसोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय कबड्डी संघाने इराणला 39-29 ने धूळ चारत कबड्डीच्या विश्वचषकावर आठव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतीय संघाने हा चषक सलग तिसऱ्यांदा आपल्या नावावर केला आहे. भारतीय कबड्डी संघाच्या या विजयानंतर टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरुन भारतीय संघाचे अभिनंदन केले. याशिवाय त्याने ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनला पुन्हा सुनावलं. भारतीय कबड्डी संघाने विश्व चषक जिंकल्यानंतर वीरेंद्र सेहवागने दोन ट्विट केले. यातील पहिल्या ट्विटमध्ये वीरुनं भारतीय संघाचं अभिनंदन केलं. तो म्हणाला की, ''हा उत्साह, हे स्पिरीट, हम को दे दे ठाकूर!!!! अजय ठाकूर तू रॉकस्टार आहेस. पराभवातूनही विजय खेचून आणणाऱ्याला टीम इंडिया म्हणातात! चॅम्पियन्स!!!'' यानंतर वीरुने आपल्या दुसऱ्या ट्वीटमधून ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गनची कोंडी केली. वीरुनं आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये, ''भारताने कबड्डी या खेळाला जन्म दिला, अन् आठवेळा विश्व चॅम्पियन बनला. पण काही देश असे आहेत, ज्यांनी क्रिकेटला जन्म दिला. पण सध्या टायपोजच दुरुस्त करण्यात व्यस्त आहेत.'' वीरुच्या या ट्वीटला ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गननेही उत्तर दिलं. मॉर्गन म्हणतो की, ''मित्रा!!! आम्ही डार्ट आणि कर्लिंगचा अविष्कार केला. पण आम्ही यात चॅम्पियन आहोत असं मी कधीही म्हणणार नाही.'' कबड्डीसंदर्भातील मॉर्गनने आणखी एक ट्विट करुन वीरुला उत्तर दिलं आहे. मॉर्गनने आपल्या ट्विटमध्ये, ''कबड्डी हा काही खेळ नाही. हा केवळ ज्येष्ठांचा भार आहे, जे चोहोबाजूंनी धावपळ करुन एक दुसऱ्याला हात मिळवतात.'' काही दिवसांपूर्वी कबड्डीच्या विश्व चषकात भारतीय संघाने इंग्लंडला 69-18 ने धोबी पछाड दिली होती. त्यावेळीही सेहवाग आणि पियर्स मार्गन ट्विटरवरुन एकमेकांसोबत भिडले होते. ब्रिटीश पत्रकार मॉर्गनच्या एका ट्वीटवरुन सेहवागने मॉर्गनला सुनावलं होतं. सेहवाग म्हणाला होता की, ''पुन्हा एकदा इंग्लंडला विश्वचषकात भारताकडून मात खावी लागली. यावेळी कबड्डीत भारताने 69-18ने धूळ चारली आहे.'' यावर मॉर्गनने सेहवागला उत्तर देताना, lose आहे, पण loose नाही असं लिहलं होतं. वीरु आणि मॉर्गनस ऑलिम्पिकमधील पीव्ही सिंधूच्या रौप्य पदकाच्या कमाईवरुन एकमेकांशी भिडले होते. तेव्हाचे या दोघांचे ट्विटयुद्ध चांगलेच रंगले होते. त्यावेळच्या वीरुच्या ट्वीटने मॉर्गनची बोलतीच बंद झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Sai Sudharsan IND vs SL : जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
जे नको होतं, तेच घडलं, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का; आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे थेट मालिकेतून बाहेर
Devdutt Padikkal Century IND vs SL : श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेची धुलाई करत देवदत्त पडिक्कलने मैदान गाजवलं; वादळी शतकही ठोकलं, पण अचानक LIVE मॅचमध्ये मैदान सोडलं, नेमकं काय घडलं?
IND vs SL : सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
सुदर्शन श्रीलंकेत पोहोचण्याआधीच गेम पलटला! देवदत्त पडिक्कल असा खेळला की टीम इंडियाच्या प्लेइंग-11चं समीकरणच बदललं
Shadab Khan Picks Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले
कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड; पाकिस्तानच्या एकाही खेळाडूचं नाव नाही, शादाब खानची ‘परफेक्ट T20 प्लेअर’ पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Embed widget