एक्स्प्लोर

फिटनेस किंग विराट कोहलीचा 'डाएट चार्ट'

विराट आपल्या फिटनेससाठी जिम आणि सरावासोबत डाएटही तितक्याचा काटेकोरपणे पाळतो.

केपटाऊन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केवळ आपल्या फिटनेसच्या जोरावर संपूर्ण क्रिकेटविश्वात एक नवी उंची गाठली आहे. त्याची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत चालली आहे. आपल्या वाढत्या वयाबरोबर विराट जास्तीत जास्त फीट होत असून एक उत्कृष्ट अॅथलीट म्हणून समोर येत आहे. आपल्या शानदार कामगिरीचं श्रेय विराट मेहनत आणि फिटनेसला देतो. मैदानावर चपळ राहण्यासाठी फिटनेसही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून विराट फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असतो. नुकतंच विराट म्हणाला होता की, 'मी यंदा 30 वर्षाचा होईन. त्यामुळे मला असं वाटतं की, वाढत्या वयासोबतच माझा फिटनेसही चांगला राहायला हवा. जेणेकरुन मी वयाच्या 34-35 व्या वर्षीही असाच खेळत राहू शकतो. यासाठीच मी प्रचंड सराव करतो.' 'जेवढा जास्त सराव करता येईल तेवढा करण्याच मी प्रयत्न करतो. जे मला सामन्याच्या वेळी उपयोगी पडतं.' असंही विराट यावेळी म्हणाला. विराटने क्रिकेटच्या मैदानात फिटनेससाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. त्यामुळे संघात येणाऱ्या नव्या खेळाडूंसाठी तो एक आदर्श ठरतो आहे. विराट आपल्या फिटनेससाठी जिम आणि सरावासोबत डाएटही तितक्याचा काटेकोरपणे पाळतो. पाहा विराटचा डाएट चार्ट : ब्रेकफास्ट : 4 अंड्याचं ऑमलेट यामध्ये तीन व्हाईट एगचा समावेश, पालक, काळी मिरी आणि चीज, ग्रील्ड मच्छी, तर फळांमध्ये पपई, ड्रॅगन फ्रूट आणि कलिंगडचा समावेश याशिवाय विराट नट बटर आणि ग्लुटन फ्री ब्रेडही खातो. तसंच दिवसभरात 3 ते 4 लेमन ग्रीन टी घेतो. लंच : ब्रेकफास्टनंतर दुपारच्या जेवणात विराट रोस्टेड चिकन, उकडलेले बटाटे, उकडलेल्या हिरव्या भाज्या आणि पालक घेतो. तसंच जेवणात मटणाचाही समावेश असतो. डिनर : विराट कोहली डिनरमध्ये फारच कमी पदार्थ घेतो. यावेळी तो फक्त उकडलेलं किवां भाजलेलं 'सी फूड'ला पसंती देतो. विराटला बटर चिकन प्रचंड आवडतं पण फिटनेससाठी त्याने गेल्या बऱ्याच दिवसात आपला आवडता पदार्थ खाल्लेला नाही. विराट जेव्हा दौऱ्यावर असतो त्यावेळी तो जिममध्ये 90 मिनिटं व्यायाम करतो. पण जेव्हा तो दौऱ्यावर नसतो त्यावेळी तो दिवसभरातील चार तासाहून अधिक वेळ जिममध्ये घालवतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटकाDevendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Embed widget