एक्स्प्लोर

परदेश दौऱ्यात खेळाडूंच्या पत्नी पूर्णवेळ सोबत असाव्यात, विराटची मागणी

सध्याच्या नियमानुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या पत्नी परदेश दौऱ्यावर दोन आठवड्यांसाठीच सोबत राहू शकतात. या नियमात बदल करण्याची मागणी विराट कोहलीने केली आहे.

नवी दिल्ली : परदेश दौऱ्यावर खेळाडूंच्या पत्नीला पूर्णवेळ सोबत ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने बीसीसीआयकडे केली आहे. सध्याच्या नियमानुसार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या पत्नी परदेश दौऱ्यावर दोन आठवड्यांसाठीच सोबत राहू शकतात. काही वृत्तांनुसार, विराटने बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडला. ज्यानंतर अधिकाऱ्यांकडून सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या सीओए समितीचे प्रमुख विनोद राय आणि डाईना इडुलजी यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सीओएने टीम इंडियाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना यासाठी एक औपचारिक विनंती करण्यास सांगितलं आहे. पण यावर तूर्तास अंतिम निर्णय घेतला जाणार नाही. 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सूत्रांनी सांगितलं, की, “ही विनंती काही आठवड्यांपूर्वीच करण्यात आली होती. बीसीसीआयच्या धोरणानुसार संघ व्यवस्थापकांना यासाठी एक औपचारिक विनंती करावी लागेल आणि त्यानंतरच निर्णय होईल. विराटची पत्नी अनुष्का शर्मासह इतर खेळाडूंच्या पत्नीही दौऱ्यावर सोबत असतात. त्यामुळे जुन्या नियमांनुसार खेळाडूंच्या पत्नींनाही संघासोबत प्रवास करता यावा, असं विराटचं म्हणणं आहे.” दरम्यान, परदेश दौऱ्यावर खेळाडूंनी पत्नी किंवा गर्लफ्रेंड सोबत नेण्याबाबत प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम आहेत. सध्या तरी बुहतांश संघाच्या खेळाडूंना कुटुंब सोबत नेण्यासाठी परवानगी दिलेली नाही. 2007 साली इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्वतंत्र क्रीडा प्रशासकांना संघाच्या 5-0 ने झालेल्या पराभवावर प्रश्न विचारला होता. तर खेळाडूंनी कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्यामुळे हा पराभव झाला, असं उत्तर आलं होतं. 2015 मध्येही अॅशेस मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ईयान हेलीने खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्स सोबत असणं हे पराभवाचं कारण आहे, असं सांगितलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
Embed widget