एक्स्प्लोर
Advertisement
सुरक्षा भेदून विराट कोहली मुलांसाठी पुढं सरसावला
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं दिल्ली विमानतळावर सुरक्षा डावलत दिव्यांग मुलांबरोबर मनसोक्त गप्पा मारत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं दिल्ली विमानतळावर सुरक्षा डावलत दिव्यांग मुलांबरोबर मनसोक्त गप्पा मारत सेल्फी काढण्याचा आनंद लुटला.
कोहली दिल्ली विमानतळाहून जेव्हा बाहेर पडला त्यावेळी विमानतळावर असलेल्या या दिव्यांग मुलांनी कोहलीला चेअरअप केलं. मुलांना पाहून कोहली स्वत:ला आवरु शकला नाही आणि तो सगळी सुरक्षा डावलत या मुलांकडे गेला.
तिथं त्यानं या मुलांशी मनसोक्त गप्पा मारल्या. आपल्या मोबाइलमध्ये त्याने मुलांसोबत सेल्फी देखील काढले. ऑटोग्राफही दिले. विशेष म्हणजे ही मुलं बराच वेळ विराटसोबत सेल्फी काढत होते. मात्र, त्यानं कोणतीही घाई न करता या मुलांना मुबलक वेळ दिला.
विराटच्या आक्रमक स्वभावामुळं अनेकदा त्याच्यावर टीकाही केली जाते. मात्र त्याचा हा हळवा स्वभाव पाहून विमानतळावर उपस्थित असणारेही थोडे भारावून गेले.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement