एक्स्प्लोर
विराट ‘नंबर वन’ तर रोहित शर्मा ‘नंबर दोन’वर, आयसीसीच्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा दबदबा
टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माला विश्वचषकात त्याच्या कारकीर्दीतला सर्वोत्तम फॉर्म गवसला आहे. टीम इंडियाच्या यशात रोहितची ही वैयक्तिक कामगिरी त्याचं पहिलं योगदान आहे.
मुंबई : यंदाच्या विश्वचषकात टीम इंडियाचे फलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसीच्या वन डे फलंदाजांच्या क्रमवारीतला नंबर वन कायम राखला आहे. तर उपकर्णधार रोहित शर्माच्या विश्वचषकातल्या कामगिरीने दुसऱ्या क्रमांकावर स्थानावर मजल मारली आहे.
विश्वचषकातल्या कामगिरीमुळे रोहित शर्माने 51गुणांची पिछाडी अवघ्या सहा गुणांवर आणून ठेवली आहे. वन डे फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित दुसऱ्या क्रमांकावर असून, त्याच्या खात्यात 885 रेटिंग गुण आहेत. विराटनं विश्वचषकात पाच अर्धशतकांसह 442 धावांचा रतीब घातला आहे. या कामगिरीनं त्याच्या खात्यात केवळ एका रेटिंग गुणाची भर घातली आहे. आयसीसीच्या क्रमवारीत विराट 891 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आझम या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 827 गुण आहेत.
टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्माला विश्वचषकात त्याच्या कारकीर्दीतला सर्वोत्तम फॉर्म गवसला आहे. टीम इंडियाच्या यशात रोहितची ही वैयक्तिक कामगिरी त्याचं पहिलं योगदान आहे. रोहितने या विश्वचषकात आतापर्यंत पाचवं शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळे एकाच विश्वचषकात सर्वाधिक पाच शतकं झळकावण्याचा विक्रम आता त्याच्या नावावर जमा झाला आहे.
रोहित शर्माची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
विश्वचषकातील सर्वाधिक शतकांच्य़ा यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर विश्वचषकात सहा शतकं आहेत. त्यामुळे रोहित शर्मा सचिनचा तो विक्रम आपल्या नावावर जमा करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement