एक्स्प्लोर

शून्य गुण असलेल्या विराटला खेलरत्न, 80 गुण मिळवूनही पुनियाला पुरस्कार नाही

विराटला शून्य गुण असूनही पुरस्कार देण्यात आला, कारण क्रिकेटसाठी गुणांची पद्धती लागू नाही. पण दुसरीकडे 80 गुण असलेल्या पुनियालाही वगळण्यात आलं आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना यंदाचा खेलरत्न जाहीर करण्याचा केंद्रीय क्रीडा खात्याचा निर्णय पैलवान बजरंग पुनियाला पटलेला नाही. याविरोधात त्याने कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. बजरंगने गेल्या चार वर्षांत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची दोन आणि एशियाडची दोन पदकं पटकावली आहेत. या कामगिरीच्या निकषावर खेलरत्न पुरस्काराच्या शर्यतीत त्याला सर्वाधिक 80 गुण मिळत आहेत. त्यामुळे यंदाचा खेलरत्न आपल्यालाच मिळायला हवा असा बजरंगचा दावा आहे. या प्रकरणात केंद्रीय क्रीडा खात्याने आपल्यावरचा अन्याय दूर करण्याची मागणी त्याने केली आहे. बजरंगने केंद्रीय क्रीडा खात्याला आज सायंकाळची मुदत दिली आहे. आपल्यावरचा अन्याय आज दूर झाला नाही, तर उद्या न्यायालयाचं दार ठोठावण्याचा इशारा बजरंग पुनियाने दिला आहे. विराटला शून्य गुण असूनही पुरस्कार का? विराटच्या परफॉर्मन्स शीटवर एकही गुण जमा नसतानाही त्याला पुरस्कार देण्यात येणार आहे, कारण, क्रिकेटच्या मानदंडांनुसार हे नियम त्याला लागू होत नाही. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मीराबाई चानूच्या पुढे सहा खेळाडू असे होते, ज्यांचे गुण तिच्यापेक्षा अधिक होते. पैलवान बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या नावावर प्रत्येकी 80 गुण आहेत, जे सर्वाधिक आहेत. दरम्यान, ही निवड लोकांच्या माध्यमातून हात वर करुन करण्यात आली होती, ज्यात निश्चित करण्यात आलं, की यंदाचा खेलरत्न कुणाला जाणार. काय आहे क्रिकेटची पद्धत? क्रिकेटसाठी गुण पद्धती लागू होत नाही. शिवाय हा खेळ ऑलिम्पिकमध्येही नाही. त्यामुळे क्रिकेटपटूंना सहमतीच्या आधारावर निवडलं जातं, ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता असते. पॅनलमधील एका सदस्याने हे मान्य केलं, की विराटच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. गुण पद्धती ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय टूर्नामेंट लक्षात ठेवून निश्चित केली जाते. मग विराटची कामगिरी कशी ओळखली जाऊ शकते, असा मुद्दा चर्चेत आला होता. विराटचं नाव 2016 आणि 2017 मध्येही वगळण्यात आलं होतं. गुणांची गरज कशामुळे? एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, विराटची जेव्हा निवड केली जाणार होती, तेव्हा लोकांनी हात वर करुन त्याच्या नावाला पसंती दिली आणि विराटची निवड करण्यात आली. क्रिकेटपटूंच्या निवडीसाठी अजून गुण पद्धती लागू नाही, तर इतर खेळाडूंची निवड गुण पद्धतीद्वारे केली जाते. मीराबाई आणि श्रीकांत यांच्या प्रकरणात सात जणांनी मीराबाईचं नाव घेतलं, तर सहा जणांनी श्रीकांतला पसंती दिली. ज्यानंतर पुरस्कारासाठी मीराबाईची निवड करण्यात आली. अकरा सदस्यीय समितीकडे हा अधिकार असतो, की ते या खेळाडूंना 20 गुण आपल्यावतीने देऊ शकतात. ज्यानंतर खेळाडूंना ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कामगिरीच्या आधारावर गुण दिले जातात. गुणतालिकेत 17 पैकी केवळ 11 खेळाडूंना निवडण्यात आलं, ज्यांना समितीने गुण दिले. पुढील पद्धतीने गुण देण्यात आले चानू (19), कोहली (18.5), श्रीकांत (18), विनेश (13), रोहन बोपन्ना (12), बजरंग पुनिया (12), नीरज चोप्रा (15), दीपा मलिक (12), विकास कृष्णन (14) मणिका बत्रा (13) आणि पॅरा रेसलर वीरेंद्र सिंह (12) यानंतर एकूण गुण चानू 63 (44+19), पुनियाला 92 (80+12), फोगाटला 93 (80+13), मलिकला 90.4 (78.4+12), बत्रा 78 (65+13) आणि विकासला 66 (52+14) गुण मिळाले. यावर्षीच्या खेलरत्न पुरस्कार समितीमध्ये दिल्ली हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती इंदरमीत कौल, माजी खेळाडू अश्विनी नचप्पा, कमलेश मेहता, समरेश जंग आणि विमल कुमार यांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या

Wasim Jaffer Picks Team India Playing XI For ODI World Cup 2027: बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
बुमराह, शामी, सिराज...वनडे वर्ल्डकप 2027 साठी वसीम जाफरने निवडली टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
Yuvraj Singh Picks Team India Squad For ODI World Cup 2027: यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत IN...ईशान किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
जैस्वाल, पंत IN...किशन OUT; वनडे विश्वचषक 2027 साठी युवराज सिंहने निवडला टीम इंडियाचा चक्रावून टाकणारा संघ
Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
मीराबाई चानूची सोनेरी कामगिरी...राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक, चार पदकांसह भारत गुणतालिकेत आठव्या स्थानी
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Rohit Pawar: MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवार अन्न व औषध विभागाच्या कार्यालयात; तुकाराम मुंढे काय म्हणाले?
Embed widget