एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कसोटी कर्णधार विराट कोहलीवर मोठा आरोप
मुंबई: इंग्लंड विरुद्ध राजकोटमध्ये खेळविण्यात आलेली पहिली कसोटी अनिर्णित राहिली. पण या कसोटीमुळे कर्णधार विराट कोहली अडचणीत येण्याची शक्यता आहे. ब्रिटिश टॅब्लॉईड डेली मेलच्या वृत्तानुसार, कोहलीनं पहिल्या कसोटीत चेंडू अयोग्यरित्या (बॉल टेम्परिंग) हाताळला होता.
एवढच नव्हे तर त्यांनी एका व्हिडिओही जारी केला आहे. ज्यामध्ये कोहली चेंडूला शाईन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या व्हिडिओच्या आधारे असा दावा करण्यात येत आहे की, कोहलीनं ICCच्या नियमाचं उल्लंघन केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसीनं होबार्ट कसोटीत चेंडू नियमबाह्य पद्धतीनं हाताळून जो गुन्हा केला, तोच गुन्हा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं राजकोट कसोटीत केल्याचा आरोप ब्रिटिश टॅब्लॉईड डेली मेलनं केला आहे.
वास्तविक भारत आणि इंग्लंड संघांमधला राजकोटचा पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. सदर कसोटीत विराटकडून आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग झाल्याचा कोणताही आरोप सामनाधिकाऱ्यांनी त्याच्यावर ठेवलेला नाही.
पण डेली मेलच्या वृत्तानुसार, विराट कोहलीनं राजकोट कसोटीत चेंडूची लकाकी राखण्यासाठी मिन्टमिश्रीत थुंकीचा वापर केला.
VIDEO:
Footage suggests #Viratkohli tampering with ball in #INDvENG first Test match More Videos: https://t.co/IHj1XiGIBepic.twitter.com/0VU1bTTQom
— Dunya News (@DunyaNews) November 22, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
करमणूक
राजकारण
क्रीडा
Advertisement