मी पाक क्रिकेट संघाची आई नाही, वीणा मलिकच्या ट्वीटवर सानिया भडकली
सानिया मिर्झा पती शोएबसोबत एका जंक फूड असलेल्या रेस्टॉरंटमध्ये गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन वीणाने सानियावर टीका केली.
मग काय, विणाच्या या ट्वीटमुळे सानियाच्या संतापाचा पारा चढला. बाळाच्या पालनपोषणावरुन प्रश्न उपस्थित करणं सानियाला सहन झालं नाही आणि तिने तिखट टिप्पणी करताना लिहिलं की, "वीणा, मी माझ्या बाळाला शीशा पॅलेस घेऊन गेली नव्हती. यासाठी तुला किंवा जगाला काळजी करण्याची गरज नाही. कारण मला वाटतं की, इतरांच्या तुलनेत मी माझ्या मुलाची चांगली काळजी घेते. दुसरी गोष्ट अशी की, मी पाकिस्तानी क्रिकेट संघाची ना डाएटिशियन आहे, ना त्यांची आई, किंवा प्राध्यापक आणि शिक्षकही नाही.Sania, I am actually so worried for the kid. You guys took him to a sheesha place isn't it Hazardious? Also as far as I know Archie's is all about junk food which isn't good for athletes/Boys. You must know well as you are mother and athlete yourself? https://t.co/RRhaDfggus
— VEENA MALIK (@iVeenaKhan) June 17, 2019
सानिया मिर्झाच्या या उत्तरानंतर वीणा मलिक म्हणाली की, "बाळ तुमच्यासोबत नव्हतं, हे समजल्याने आनंद झाला. तू पाकिस्तानी संघाची डाएटेशियन किंवा आई आहेस, असं मी म्हटलं होतं का? मी म्हणाले होते की, तू अॅथलीट आहे, फिटनेस किती महत्त्वाचं आहे हे तुला माहित नाही का? तू क्रिकेटरची पत्नी नाहीस का? तुला पतीच्या आरोग्याची काळजी करायला हवी. मी काही चुकीचं बोलतेय का? सानियाने वीणा मलिकवर आणखी एक ट्वीट केलं, परंतु तिने नंतर ते डिलीट केलं. पण तोपर्यंत नेटीझन्सनी त्या ट्वीटचं स्क्रीन शॉट घेतला होता. सानियाच्या डिलीट ट्वीटचा स्क्रीन शॉट वीणानेही शेअर केला. या ट्वीटमध्ये सानियाने म्हटलं होतं की, "कधी झोपायचं, कधी उठायचं, काय खायचं हे आम्हाला माहित आहेत. सर्वात महत्त्वाची आणि काळजीची बाब म्हणजे मासिकांच्या कव्हर पेजसाठी तू जे केलं, ते बालकांसाठी योग्य नाही. तुला माहित नाही का ते धोकादायक आहे. पण लेकिन आमची काळजी करण्यासाठी खूप आभार."Veena,I hav not taken my kid to a sheesha place. Not that it’s any of your or the rest of the world’s business cause I think I care bout my son a lot more than anyone else does :) secondly I am not Pakistan cricket team’s dietician nor am I their mother or principal or teacher- https://t.co/R4lXSm794B
— Sania Mirza (@MirzaSania) June 17, 2019
यानंतर वीणाने आणखी एक ट्वीट केलं. थोडी हिंमत दाखव आणि ट्वीट डिलीट करु नको. सुदैवाने तंत्रज्ञान एवढं प्रगत झालंय की लोक आपलं कृत्य नाकारु शकत नाही. ज्या मासिकाच्या कव्हर पेजचा तू उल्लेख केला, ते मॉर्फ्ड होत. मी तुझे सर्व वाद पुन्हा उकरुन काढू शकते. पण मला विषयांतर करायचं नाही.Have some guts & don't delete ur tweets.Fortunately the technology has progressed so much that people can't deny their acts.Oh the magazine's cover u mentioned had morphed images.Also I can bringup all the controversies U have ever had bt I would rather not divert the discusion. pic.twitter.com/8qednFvEBz
— VEENA MALIK (@iVeenaKhan) June 17, 2019
व्हायरल व्हिडीओचा दावा व्हायरल व्हिडीओमधून दावा केला जात होता की, मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये खेळवलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याआधी शोएब मलिकसह पाकिस्तानी खेळाडू रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. त्यांना आपल्या फिटनेसची अजिबात काळजी नाही, असं म्हटलं जात होतं. तर भारताविरुद्धच्या सामन्यात शोएब शून्यावर बाद झाला. यानंतर काहींनी त्याला निवृत्तीचा सल्ला दिला. मात्र खेळाडू शुक्रवारी रात्री रेस्टॉरंटमध्ये गेले होते, शनिवारी नाही, असं स्पष्टीकरण पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने दिलं होतं. परवानगीशिवाय व्हिडीओ बनवून तो शेअर केल्याने सानिया मिर्झाने संताप व्यक्त केला होता. पाकिस्तानात सानिया ट्रेण्डिंगमध्ये मात्र सानिया मिर्झा आणि वीण मलिक यांच्या ट्विटरवर झालेल्या या वादाचा नेटीझन्स मज्जा लुटत होते आणि ते ही यात सामील झाले. पाकिस्तानमध्ये याला अतिशय महत्त्व दिलं जात आहे. पाकिस्तानात तर सानिया मिर्झा ट्रेण्ड करत होती.Okay so this Happened. First, she tweeted then deleted that tweet right away and blocked me. I mentioned my concerns in a very civilised, calm & composed manner. It could have been a healthy debate. pic.twitter.com/aw6C36xI3o
— VEENA MALIK (@iVeenaKhan) June 17, 2019