Vaibhav Suryavanshi Receives Comments From Women : वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज शतकानंतर दोन हलकट महिलांची अत्यंत अश्लील अन् अभद्र कमेंट; पोस्ट सोशल मीडियात व्हायरल
अनेक ट्विटर यूझर्सनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली. इतकेच नव्हे, तर हीच कमेंट पुरुषांकडून 14 वर्षीय मुलीवर झाली असती, तर देशातील मीडियानं, काय केलं असतं? अशीही विचारणा काही युझर्सनी केली.

Vaibhav Suryavanshi Receives Comments From Women : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) अवघ्या 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीनं (Rajasthan Royals’ 14-year-old Vaibhav Suryavanshi) आयपीएलमध्ये (IPL 2025) गुजरात टायटन्सविरुद्धच्या (Gujarat Titans) विक्रमी शतकी खेळीनंतर अवघ्या देशानं नव्हे, तर जगाने कौतुकाचा वर्षाव केला. 14व्या वर्षी काय करायचं हे अनेक मुलांना सूचत नसताना जगातील भेदक गोलंदाजांसमोर त्याने केलेली बेधडक फलंदाजी कौतुकाचा विषय झाला. वैभव आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर ठरला, ज्यामुळे सर्वांनाच अभिमान वाटला. त्याच्या धाडसी कामगिरीनंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर (ट्विटर) दोन हलकट महिला युझर्सनी (Vaibhav Suryavanshi Receives Comments From Women) त्याच्याबद्दल अत्यंत हलकट कमेंट केल्या. वैभव अवघ्या 14 वर्षाचा असल्याने त्या कमेंट पाहून अनेकांच्या संतापाचा पारा चढला. अनेक ट्विटर यूझर्सनी त्यांचा समाचार घेतलाच, पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली. इतकेच नव्हे, तर हीच कमेंट पुरुषांकडून 14 वर्षीय मुलीवर झाली असती, तर सोशल मीडिया, देशातील मीडियाने काय केलं असतं? अशीही विचारणा काही युझर्सनी केली.
🔸Vaibhav Suryavanshi is just a 14 year old minor child.
— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) April 29, 2025
🔸Imagine if a man had tweeted the same about a 14 year old girl. There would be an outrage on social media and news channel.#POCSO has always gone for fishing in such cases. pic.twitter.com/4zdYd2M8Hj
नेटिझन्सकडून सायबर सेलकडे कारवाईसाठी सूचना
वैभवला आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पणींना सामोरे जावे लागल्याने मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे. त्या दोन महिलांनी केलेल्या टिप्पण्या देणे आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. या आक्षेपार्ह टिप्पण्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नेटिझन्सकडून करण्यात आली आहे. कायदेशीर तज्ज्ञांनी POCSO प्रकरण आणि सायबर सेल कारवाईसाठी सूचना दिल्या आहेत.
A content creator, an adult woman finding a Sugar Daddy in a Child
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) April 29, 2025
Reverse the Genders & this would invite cognizance by NCW, NCPCR & Police as well
You'll escape all that @Niuu_d only because you're a woman pic.twitter.com/Vkzbfrx8DL
कायदेशीर व्यावसायिक आणि बाल हक्क कार्यकर्ते या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत आणि अधिकाऱ्यांना लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण (POCSO) कायद्याच्या योग्य तरतुदी लागू करण्याचे आवाहन करत आहेत. एका पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “यामागे जो कोणी असेल त्याच्याविरुद्ध POCSO खटला दाखल करावा. आणि सायबर सेल पोलिस विभागांनी हे सुनिश्चित करावे की असे पुन्हा कधीही घडणार नाही”

अल्पवयीन मुलांचा ऑनलाइन छळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून करण्यात आली आहे. आक्षेपार्ह टिप्पण्यांचे स्क्रीनशॉट ऑनलाइन व्हायरल होत असल्याने पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी नेटिझन्सकडून मागणी आहे. बहुतेक ऑनलाइन वापरकर्ते सरकारी हँडल, बाल हक्क संघटना आणि सायबर गुन्हे युनिट्सना आवाहन करत आहेत आणि किशोरवयीन मुलाबद्दल असंवेदनशील टिप्पणी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























