Ruturaj Gaikwad Marriage : शुभमंगल सावधान! ऋतुराज गायकवाड बोहल्यावर चढणार, आयपीएलनंतर घेणार सात फेरे
Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच बोहल्यावर चढणार आहे. येत्या जूनमध्ये ऋतुराज गायकवाड लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे.
Ruturaj Gaikwad Marriage : चेन्नई आणि गुजरात या संघामध्ये आज आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा महाअंतिम थरार रंगणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर जेतेपदासाठी टक्कर होतेय. त्याआधीच ऋतुराज गायकवाड याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ऋतुराज गायकवाड लवकरच बोहल्यावर चढणार आहे. येत्या जूनमध्ये ऋतुराज गायकवाड लग्नगाठ बांधणार असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाड उत्कर्षा पवारसोबत लग्न करणार आहे.
चेन्नईकडून खेळणारा टीम इंडियाचा स्टार खेळाडू लग्नबंधनात अडकत आहे. त्यामुळेच ऋतुराज गायकवाड याने आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधून माघार घेतल्याचे वृत्त आहे. रिपोर्ट्सनुसार, 3 आणि 4 जूनदरम्यान ऋतुराज गायकवाड लग्नबंधनात अडकणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिलेय.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, ऋतुराज गायकवाड याने लग्नामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधून माघार घेतली आहे. ऋतुराज गायकवाड याला स्टँडबाय खेळाडू म्हणून निवडण्यात आले होते. लग्नामुळे ऋतुराजने माघार घेतली आहे. त्याच्याजागी यशस्वी जायस्वाल याला स्थान देण्यात आले आहे.
यशस्वी जयस्वालचं नशीब फळफळलं, टीम इंडियात वर्णी
यशस्वी जायस्वालचा आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलसाठी ऋतुराज गायकवाडच्या जागी स्टँडबाय खेळाडू म्हणून भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाडचं 3 जून 2023 ला लग्न होणार आहे, यामुळे आता यशस्वी जयस्वालला संघात संधी देण्यात आली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी यशस्वी जयस्वालची निवड
बीसीसीआयने ऋतुराज गायकवाडला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी स्टँडबाय सलामीवीर म्हणून टीम इंडियामध्ये समाविष्ट केलं होतं. पण ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, ऋतुराज गायकवाडने बीसीसीआयला माहिती दिली आहे, की तो 5 जूननंतरच संघात सामील होऊ शकेल. दरम्यान, यशस्वी जयस्वाल यांच्याकडे यूकेचा व्हिसा असल्याने तो संघात सामील होऊ शकेल. येत्या काही दिवसांत लंडनला जाणार आहे.
Who is Utkarsha Pawar?
उत्कर्षा पवार आणि ऋतुराज गायकवाड दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्या वर्षी उत्कर्षा एका जिम सेशनमध्ये ऋतुराजसोबत दिसली होती. मात्र, असे असूनही ऋतुराजच्या चाहत्यांसाठी उत्कर्षा ही एक मिस्ट्री गर्लच राहिली होती. कारण उत्कर्षा सोशल मीडियावर सक्रीय नाही. या दोघांनी आपले नाते खूप गुपीत ठेवले.. नात्याबद्दल दोघांनाही कधीही शब्द काढला नाही.. कधीही फोटो शेअर केले नाहीत. ऋतुराजने कधीही उत्कर्षाचा कोणताही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेला नाही. दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पण, कोणालाच त्यांच्या नात्याविषयी जास्त माहिती नाही. आता हे दोघेही जूनमध्ये लग्नबंधनात उडकणार आहेत.