U-17 World Championship : अभिमानास्पद! भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा, तब्बल 32 वर्षानंतर कुस्तीपटू सूरज वशिष्ठने U-17 विश्व चॅम्पियनमध्ये मिळवलं सुवर्णपदक
भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने ( Suraj Vashisht) अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास घडवला आहे. त्याने 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.
U-17 World Championship : भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने ( Suraj Vashisht) अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास घडवला आहे. त्याने कुस्तीच्या 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तब्बल 32 वर्षानंतर भारतानं विश्व चॅम्पियनमध्ये कुस्तीत (United World Wrestling) सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. सुरजने अंतिम सामन्यात अझरबैजानच्या फराइम मुस्तफायेवचा 11-0 असा पराभव केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा सूरज हा तिसरा भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू ठरला आहे. यापूर्वी पप्पू यादवने 32 वर्षांपूर्वी देशासाठी सुवर्णपदक जिंकले होते.
दरम्यान, 17 वर्षांखालील कुस्ती स्पर्धेत सूरजने मिळवलेला विजय हा ऐतिहासिक आहे. तब्बल 32 वर्षांनंतर त्याने या स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक मिळवून दिले आहे. यापूर्वी 1990 मध्ये पप्पू यादवने सुवर्णपदक पटकावले होते. या स्पर्धेतील हे तिसरे सुवर्ण पदक ठरले आहे. पप्पूच्या आधी विनोद कुमारने 1980 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. सूरजच्या मॅचबद्दल बोलायचं झालं तर, त्याने खूप आक्रमक सुरुवात केली. यानंतर संपूर्ण सामन्यात सूरज हा अझरबैजानच्या कुस्तीपटू फराइम मुस्तफायेवला वरचढ ठरला. दरम्यान, युवा कुस्तीपटू सूरजच्या विजयाबद्दल अनेकजण त्याचे अभिनंदन करत आहेत. भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सूरजचे अभिनंदन केले. त्याने सूरजचा फोटो ट्विट केला आहे. तसेच 'सूरजने इतिहास रचला आहे. त्याने 32 वर्षांनंतर अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याचे भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
सूरज वशिष्ठने अंडर-17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. या पदकाची कमाई केल्यानं सुरजने इतिहास रचला आहे. सुरच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तब्बल 32 वर्षानंतर भारताने हा इतिहास घडला आहे. या विजयानं भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Asian Wrestling Championships : आशियाई कुस्ती स्पर्धेत अंशू मलिक आणि राधिकाला रौप्यपदक, मनीषाला कांस्य