एक्स्प्लोर
सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवागची नवी शिकार
नवी दिल्ली : नजफगडचा नवाब अशी ओळख असलेला क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग जेव्हा मैदानात फलंदाजीसाठी उतरतो, तेव्हा विरोधी संघ आणि गोलंदाजांमध्ये खळबळ असते. पण वीरु सध्या क्रिकेटच्या मैदानात नाही तर सोशल मीडियावर धम्माल करत आहे.
वीरेंद्र सेहवाग ट्विटरच्या माध्यमातून विनोदी ट्वीट्सने सगळ्यांचं मनोरंजन करत आहेत. तो सध्या क्रिकेटर्सना पर्सनल ट्वीटही करत आहे. याआधी रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरसह अनेक क्रिकेटर त्याची शिकार बनले होते. आता यामध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा क्रिकेटर उमर अकमल.
26 वर्षीय उमर अकमल ट्विटर अॅक्टिव्ह असतो. पण बऱ्याच वेळा तो ट्विटवर वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो पोस्ट करतो. सेहवागने त्यापैकी एका फोटोची थट्टा केली आहे.
https://twitter.com/virendersehwag/status/755746308934303744
सेहवागने अकमलचा फोटो शेअर करताना लिहिलं आहे की, ‘मैं तो नन्हा सा, मुन्ना सा, प्यारा सा बच्चा हूं. एक साथ 4-4 बॅट. बॅटसह उत्तम गुणवत्ता उमर अकमल.’
या ट्वीटमध्ये सेहवागने अकमलच्या अपरिपक्वतेची थट्टा केली आहे. गुणवत्ता असूनही तो त्याला योग्य न्याय देताना दिसत नाही. त्यामुळेच तो राष्ट्रीय संघातून बाहेर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement