U19 Women's T20 World Cup : पहिल्यांदाच रंगणार महिला U19 टी-20 वर्ल्ड कप, 'हे' 12 संघ ठरले पात्र
ICC U19 Women's T20 World Cup : पुढच्या वर्षी महिला अंडर-19 टी-20 वर्ल्ड कप साऊथ आफ्रिकेमध्ये खेळवला जाणार आहे. याच्या पहिल्या सीझनसाठी पात्रता सामने सुरु झाले आहेत. या विश्वचषकामध्ये भारतासह अनेक इतर देश भाग घेणार आहेत.
ICC Under-19 Women's T20 World Cup : आयसीसी (ICC) अर्थात इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल (International Cricket Council) नं गेल्या वर्षी एक मोठी घोषणा केली होती. आयसीसीने 2023 ते 2031 या कालावधीतील क्रिकेटच्या घोषणा केली होती. आयसीसीने यामध्ये पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी आणि महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. 2023 साली आंतरराष्ट्रीय महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
16 संघांमध्ये लढत
दक्षिण आफ्रिकेत पुढील वर्षी महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. यामध्ये पहिल्या सत्रासाठीचे पात्रता सामने सुरू झाले आहेत. महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतासह अनेक संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघात लढत पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा जानेवारीमध्ये सुरू होणार आहे.
What does the qualification pathways for the first-ever ICC U19 Women’s T20 World Cup look like 👀
— ICC (@ICC) June 1, 2022
Details ➡️ https://t.co/JgTg57lBAU pic.twitter.com/wwe6EeSo0K
'हे' 12 संघ ठरले पात्र
महिला अंडर-19 टी-20 विश्वचषकासाठी आतापर्यंत 12 संघ थेट पात्र ठरले आहेत. यामध्ये भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या 11 देशांचा समावेश आहे. यामध्ये अमेरिकेला सदस्य राष्ट्र असल्यामुळे पात्रता दिली गेली आहे. उर्वरित चार जागांसाठी अनेक देशांदरम्यान स्पर्धा होणार आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत अंडर-19 टी20 विश्वचषकासोबतच आयसीसी महिला T20 विश्वचषकही खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- IND vs SA : टी 20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात दाखल, 9 जून रोजी पहिला सामना
- ENG vs NZ: इंग्लंडला मोठा धक्का! जॅक लीच लॉर्ड्स टेस्टमधून बाहेर, फिल्डिंग करताना डोक्याला दुखापत
- Shreyas Iyer: श्रेयस अय्यरनं खरेदी केली मर्सिडीज, किंमत पाहून उडेल तुमची झोप