एक्स्प्लोर

Krishna Nagar Wins Gold: : पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरची 'सुवर्ण' कामगिरी, भारताचं पाचवं सुवर्णपदक, एकूण पदकसंख्या 19 वर

Tokyo Paralympic Krishna Nagar : पॅरालिम्पिकमध्ये कृष्णा नागरनं (Krishna Nagar) इतिहास रचला आहे. कृष्णानं भारताच्या खात्यात पाचवं सुवर्णपदक आणलं आहे.

Krishna Nagar : पॅरालिम्पिकमध्ये कृष्णा नागरनं (Krishna Nagar) इतिहास रचला आहे. कृष्णानं भारताच्या खात्यात पाचवं सुवर्णपदक आणलं आहे. आज सकाळी सुहास यथिराजनं रौप्यपदकं भारताच्या खात्यात मिळवून दिल्यानंतर कृष्णानं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. त्यानं हॉन्गकॉन्गच्या चू मान कायचा 2-1 असा पराभव केला.

पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरनं पहिला सेट 21-17 असा जिंकला. तर हॉन्गकॉन्गच्या चू मान कायनं दुसरा सेट जिंकत वापसी केली. शेवटचा तिसरा सेट जिंकत कृष्णानं भारताला पाचवं सुवर्णपदक जिंकून देत इतिहास रचला आहे. कृष्णानं काल झालेल्या सेमीफायनलमध्ये त्यानं ग्रेट ब्रिटनच्या क्रिस्टन कूंब्सला पराभूत करत फायनलमध्ये एन्ट्री मारली होती.

Tokyo Paralympic : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजनं रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्य पदक 

त्याआधी सुहास यथिराजनं ( Suhas L Yathiraj ) इतिहास रचला. त्यानं बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक  मिळवून दिलं. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या नंबरवर असलेल्या सुहासनं आज बॅडमिंटन पुरुष एकेरीत SL4 प्रकारात हे पदक जिंकलं. अंतिम सामन्यात फ्रान्सच्या के एल माजुरनं त्याचा 21-15, 17-21, 15-21 असा पराभव केला. पराभव जरी झाला असला तरी सुहासनं भारताला पदक मिळवून दिलं आहे. नोएडाचा डीएम असलेला सुहास एल यथिराजनं आजच्या दिवसाची सुरुवात धमाकेदार करुन दिली आहे. काल खेळलेल्या सेमीफायनल सामन्यात सुहासनं सोपा विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानं डोनेशिया चे फ्रेडी सेतियावानला 31 मिनिटामध्ये सरळ सेटमध्ये 2-0 असं पराभूत केलं होतं. पहिला सेट 21-9 तर दुसरा सेट  21-15 असा जिंकत सुहासनं फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये त्याला निराशा हाती लागली. 

Tokyo Paralympics : पॅरालिम्पिक समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान 'गोल्डन गर्ल' अवनी लेखराकडे

ध्वजवाहकाचा मान 'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा हिला

पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोह सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे. या समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान 'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा हिला (Avani Lekhra) मिळाला आहे. 19 वर्षीय पॅरालिम्पिक शूटर अवनी लेखराने टोकियो  पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर एयर रायफल एसएच 1 या स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं. तसेच नंतर एका कांस्य पदकावरही नाव कोरलं होतं. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई करणारी अवनी लेखरा ही पहिलीच खेळाडू आहे. 

भारताची सर्वोत्तम कामगिरी
टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताकडे आता एकूण 19 पदके आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रविवारी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारत गुणतालिकेत 26 व्या स्थानावर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
Israel Gaza Airstrike : युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
World Most Expensive Dog : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Video : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Crime Update | नागपूरच्या दगडफेकीमागे काश्मीर दगडफेकीचा पॅटर्न, पोलिसांचा तपास सुरुABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 : 12 Noon100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 18 March 2025 : 11 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
Israel Gaza Airstrike : युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
युद्धविरामानंतर गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला, 413 ठार, शेकडो जखमी; हमासची धमकी, आता 59 इस्रायली ओलीसांना वाचवणं कठीण
World Most Expensive Dog : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Video : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Sangli News : भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Embed widget