Tokyo Paralympic : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजनं रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्य पदक
Tokyo Paralympic : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये शेवटच्या दिवशी सुहास यथिराजनं ( Suhas L Yathiraj )इतिहास रचला आहे. त्यानं बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे.
![Tokyo Paralympic : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजनं रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्य पदक Badminton Men's Singles SL4: Noida DM Suhas L Yathiraj loses to France's Lucas Mazur, bags silver Tokyo Paralympic : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजनं रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्य पदक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/09/05/896d1318bf885cb0cd56654f783e783d_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tokyo Paralympic : टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये शेवटच्या दिवशी सुहास यथिराजनं ( Suhas L Yathiraj ) इतिहास रचला आहे. त्यानं बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या नंबरवर असलेल्या सुहासनं आज बॅडमिंटन पुरुष एकेरीत SL4 प्रकारात हे पदक जिंकलं. अंतिम सामन्यात फ्रान्सच्या के एल माजुरनं त्याचा 21-15, 17-21, 15-21 असा पराभव केला. पराभव जरी झाला असला तरी सुहासनं भारताला पदक मिळवून दिलं आहे.
नोएडाचा डीएम असलेला सुहास एल यथिराजनं आजच्या दिवसाची सुरुवात धमाकेदार करुन दिली आहे. काल खेळलेल्या सेमीफायनल सामन्यात सुहासनं सोपा विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानं डोनेशिया चे फ्रेडी सेतियावानला 31 मिनिटामध्ये सरळ सेटमध्ये 2-0 असं पराभूत केलं होतं. पहिला सेट 21-9 तर दुसरा सेट 21-15 असा जिंकत सुहासनं फायनल गाठली होती. मात्र फायनलमध्ये त्याला निराशा हाती लागली.
भारतासाठी कालचा दिवस चांगला
पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी कालचा दिवस चांगला राहिला. काल सकाळी पहिला नेमबाज मनीष नरवालने भारतासाठी सुवर्ण जिंकले. यानंतर संध्याकाळी प्रमोद भगतने बॅडमिंटन स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अशा प्रकारे भारताला आतापर्यंत चार सुवर्णपदके मिळाली आहेत. याशिवाय 50 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सिंहराज आणि बॅडमिंटनमध्ये मनोज सरकार यांनी कांस्यपदक जिंकले. अशा प्रकारे भारताने काल दोन सुवर्णांसह एकूण चार पदके जिंकली.
मनीष नरवालने केली सुरुवात
हरियाणातील कठुरा गावातील रहिवासी मनीष नरवाल यांनी वयाच्या 19 व्या वर्षी इतिहास रचला. त्याने 50 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. सिंगराज याच स्पर्धेच्या अंतिम फेरीत कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला.
Tokyo Paralympics 2020: आणखी एक गोल्ड! प्रमोद भगतला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण तर मनोज सरकारला कांस्य
बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकणारा प्रमोद भगत पहिला भारतीय
बॅडमिंटन यावर्षी पॅरालिम्पिक स्पर्धेत डेब्यू करत आहे. जगातील नंबर वन खेळाडू भगत या खेळात सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला. त्याने अंतिम फेरीत डॅनियन बेथेलचा 21-14 आणि 21-17 असा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याचबरोबर भारताच्या मनोज सरकारनेही बॅडमिंटन स्पर्धेत चमत्कार केला. त्याने कांस्यपदक जिंकले. मनोजने जबरदस्त कामगिरी करत जपानच्या डेसुके फुजीहाराला सरळ गेममध्ये 22-20 आणि 21-13 असे पराभूत केले.
भारताची सर्वोत्तम कामगिरी
टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताकडे आता एकूण 18 पदके आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. रविवारी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताने आतापर्यंत चार सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. त्याचबरोबर भारत गुणतालिकेत 26 व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)