एक्स्प्लोर
कोच कुंबळे आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत: विराट

बर्मिंगहम: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत वि. पाकिस्तान सामन्याला फक्त काही तास उरले आहेत. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं प्रशिक्षक अनिल कुंबळेशी कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, 'आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ज्या बातम्या येत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. कोणतीही ठोस माहिती हाती नसताना अशी चर्चा करणं योग्य नाही.' पाकिस्तानविरुद्ध सामन्याबाबत बोलताना विराट म्हणाला की, 'आम्ही पाकिस्तानसोबत फारच कमी क्रिकेट खेळतो, पण आम्हाला त्यांची बलस्थानं माहिती आहेत. त्यामुळे आम्ही या मॅचबाबत जागरुक आहोत.' या सामन्यासाठी टीम कोणताही दबाव न घेता मैदानात उतरेल असंही यावेळी विराट म्हणाला. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील शेवटचा सामना मागील वर्षी 2016 मध्ये एशिया कपमध्ये झाला होता. संबंधित बातम्या: भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सावट
आणखी वाचा























