एक्स्प्लोर

मुंबई इंडियन्ससाठी देवाचा धावा करणाऱ्या 'या' आजीबाई आहेत..

मुंबई : आयपीएलच्या दहाव्या मोसमात मुंबई आणि पुण्यात रंगलेला अंतिम सामना अखेरच्या चेंडूपर्यंत अत्यंत थरारक झाला. मुंबईने अवघ्या एका धावेने पुण्यावर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचे चौकार-षटकार बरसू लागले. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरल्या त्या 'मुंबई इंडियन्स' संघाच्या गराड्यात बसून देवाचा धावा करणाऱ्या आजीबाई. या आजीबाई नेमक्या कोण आहेत, याविषयी चर्चांना उधाण आलं. या आजींनी केलेल्या प्रार्थना फळाला आल्यामुळे मुंबई जिंकली, इथपासून आजींना भारत-पाक सामन्याचंही निमंत्रण द्या, अशा वेगवेगळ्या पोस्ट्स व्हायरल झाल्या. मात्र ही वृद्ध महिला कोण आहे, त्याचा थांगपत्ता अनेकांना लागला नाही. आयपीएलच्या दहाव्या पर्वाची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा उंचावली. या सामन्यात सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या अर्थातच मैदानातील खेळाडूंकडे आणि मैदानाबाहेर, प्रेक्षकांमध्ये बसून देवाचा मनोभावे धावा करणाऱ्या पौर्णिमा यांच्याकडे. एकीकडे नखं खाणारे, खुर्चीच्या टोकावर बसलेले प्रेक्षक होते, तर दुसरीकडे विजयासाठी कौल लावून बसलेल्या या आजीबाई. या आजीबाई आहेत मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण अर्थात नीता अंबानी यांच्या मातोश्री. या आजीबाईंचं नाव आहे पौर्णिमा दलाल. त्यांना प्रामुख्याने 'नानी' असं संबोधलं जातं, आणि त्या संघाचा लकी चार्म आहेत, असं अभिषेक बच्चनने ट्विटरवर म्हटलं आहे. https://twitter.com/juniorbachchan/status/866536517325307904 आयपीएलच्या दहाव्या मोसमाची ट्रॉफी मुंबई इंडियन्सने उंचावली. रायझिंग पुणे सुपरजायंट्सवर अवघ्या एका धावेने मुंबईने विजय मिळवला. आयपीएलमध्ये मुंबईने तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. मुंबई इंडियन्सने विजयासाठी दिलेल्या 130 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पुण्याने चांगली सुरुवात केली होती. मात्र अखेरच्या क्षणी पुण्याचा डाव गडगडला. पुणे संघ 6 बाद 128 धावांपर्यंतच मजल मारु शकला. मुंबईच्या या थरारक विजयाचा शिल्पकार ठरला तो डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन. पुण्याला विजयासाठी अखेरच्या षटकांत 11 धावांची गरज असताना, मिचेल जॉन्सननं मनोज तिवारी आणि स्टीव्ह स्मिथच्या विकेट्ससह नऊच धावा मोजून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

संबंधित बातम्या :

IPL: शेवटच्या क्षणी रोहितचा गोलंदाजांना 'खास' सल्ला!

मुंबईला विजेतेपद, मात्र ऑरेन्ज, पर्पल कॅपचा मान हैदराबादला!

मुंबईच्या विजयानंतर जॉस बटलर न्यूड, व्हिडिओ व्हायरल

IPL: मुंबई-पुणे सामन्यातील शेवटच्या षटकातील थरार!

सारसबाग v/s राणीची बाग, सोशल मीडियावर विनोदाचा पूर

#IPL final मध्ये मुंबईची बाजी, पुण्यावर एका धावेने विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget