India vs Netherlands : तीन शतकं हुकली, पण टाॅप 5 फलंदाजांची फिप्टी अन् वर्ल्डकपच्या इतिहासात पराक्रमाची नोंद!
India vs Netherlands : टीम इंडियाकडून कॅप्टन रोहितसह शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या लोकल बाॅय लोकेश राहुलने सुद्धा अर्धशतकी खेळी केली.
बंगळूर : तुफानी फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाचा अखेरचा अखेरचा साखळी सामना आज नेदरलँडशी (India vs Netherlands) होत आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कॅप्टन हिटमॅन रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय टीम इंडियाच्या शिलेदारांनी सार्थ ठरवला. टाॅपच्या चारही फलंदाजांनी एकाच सामन्यात 50+ धावा करत वर्ल्डकपमधील आगळावेगळा पराक्रम केला.
KL Rahul also reaches his FIFTY in Bengaluru 😎
— BCCI (@BCCI) November 12, 2023
This has been a clinical knock as #TeamIndia sail past 3⃣0⃣0⃣
Follow the match ▶️ https://t.co/efDilI0KZP#CWC23 | #MenInBlue | #INDvNED pic.twitter.com/SF1mHHZ3ft
टीम इंडियाकडून कॅप्टन रोहितसह शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेल्या लोकल बाॅय लोकेश राहुलने सुद्धा अर्धशतकी खेळी केली.
- Fifty for Rohit.
— Johns. (@CricCrazyJohns) November 12, 2023
- Fifty for Gill.
- Fifty for Kohli.
- Fifty for Iyer.
- Fifty for Rahul.
First time ever in 48 year old World Cup 🇮🇳 - India creating history in World Cup 2023. pic.twitter.com/N6EI2f1m8S
रोहित आणि गिलने डावाची सुरुवात झांजावती करताना नेदरलँडची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी अवघ्या 11.5 षटकात 100 धावांची सलामी दिली. शुभमन 51 धावा करून बाद झाला. रोहित शर्मा सुद्धा 61 धावांची खेळी करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयसने भारतीय संघाचा डाव सांभाळात दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. मात्र, विराट कोहली या सामन्यामध्ये मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच 51 धावांवरती बाद झाला. त्यामुळे तीन फलंदाजांची शतके हुकली.
HISTORY IN WORLD CUP 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) November 12, 2023
- This is the first time the first 4 batters have scored 50+ in an innings. pic.twitter.com/MyIpwjhXc1
त्यानंतर पुन्हा एकदा श्रेयस आणि लोकेश राहुलने संघाचा डाव सांभाळत दमदार फलंदाजी केली. त्यामुळे पाचही फलंदाजांकडून अर्धशतकी खेळी झाली. हा वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम आहे. आजपर्यंत कोणत्याच संघाच्या टॉपच्या चार खेळाडूंकडून पन्नासहुन अधिक धावा केलेल्या नाहीत. मात्र, भारतीय संघाने ही कामगिरी एक नवे दोन नव्हे तर तब्बल सहाव्यांदा केली आहे. चालू वर्षात दुसऱ्यांदा ही कामगिरी झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या