(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Asian Games 2023 : स्टंपऐवजी खूर्च्या अन् टीम इंडियाची चायनीज मुलांसोबत रंगली धमाल; आशियाई गेम्समधील स्पेशल नजराणा
Asian Games 2023 : एक मुलाने शाॅट मारल्यानंतर स्लीपला असलेल्या अर्शदीप सिंगचा आनंद पाहण्यासारखा आहे. बाॅल लाँग ऑफकडे मारल्यानंतर त्या मुलाचाही आनंद गगनात मावेनासा होतो.
आशियाई गेम्स 2023 : आशियाई गेम्समध्ये भारताने पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे. दुसरीकडे आशियाई गेम्समध्ये सहभागी झालेला टीम इंडियाची ज्युनिअर क्रिकेट टीम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशशी उद्या (6 ऑक्टोबर) भिडणार आहे. सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवर आज टीम इंडियाने कसून सराव केला.
यावेळी चायनीज स्वयंसेवकासोबत टीम इंडियाने मैदानात चांगलीच करमणूक केली. यावेळी टीम इंडियाचे खेळाडू आणि चायजीन स्वयंसेवक असलेल्या मुलांची मॅच रंगली. यावेळी दोन्हीकडे स्टंपऐवजी खूर्च्या लावण्यात आल्या होत्या. यावेळी एक मुलाने शाॅट मारल्यानंतर स्लीपला असलेल्या अर्शदीप सिंगचा आनंद पाहण्यासारखा आहे. बाॅल लाँग ऑफकडे मारल्यानंतर त्या मुलाचाही आनंद गगनात मावेनासा होतो. भारतात क्रिकेट हा धर्म असला, तरी चीनमध्ये क्रिकेट लोकप्रिय नाही.
#TeamIndia play a quick game of cricket with the local volunteers in China ahead of the #AsianGames semifinal 😃👌#IndiaAtAG22 pic.twitter.com/4LhzvGV1Zq
— BCCI (@BCCI) October 5, 2023
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील टीमने सेमीफायनलमध्ये
दुसरीकडे, यशस्वी जयस्वालने धमाकेदार शतक झळकात भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नेले. परंतु नेपाळच्या क्रिकेटपटूंनी 23 धावांनी पराभूत होत दमदार लढत दिली. जयस्वाल हा भारताकडून सर्वात तरुण T-20 शतकवीर ठरला. त्याच्या 49 चेंडूतील 100 धावांमुळे भारताने 4 बाद 202 पर्यंत मजल मारली. परंतु नेपाळच्याअनुभवाच्या अभावामुळे त्यांचा डाव 9 बाद 179 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील टीमने सेमीफायनला पोहोचली.
भारताचा कर्णधार रुतुराज गायकवाडने कबूल केले की हा दिवस त्यांचा सर्वोत्तम नव्हता. नेपाळच्या दमदार कामगिरीचेही त्याला आश्चर्य वाटले नाही. तो म्हणाला की, नेपाळ आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला एक आंतरराष्ट्रीय संघ आहे, ज्यांनी आशिया चषकसारख्या स्पर्धा सर्व मुख्य संघांसोबत खेळल्या आहेत. त्यांनी भारताच्या मुख्य संघाविरुद्धही सुमारे 250 धावा केल्या आहेत. त्यांची एक चांगली बाजू आहे. बुधवारी मलेशियाविरुद्धच्या त्यांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेशने अवघ्या दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.
दरम्यान, भारत विरुद्ध बांगलादेश सेमीफायनल लढत उद्या शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 6.30 पासून सुरु होणार आहे. झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी पिंगफेंग क्रिकेट फील्ड येथे उपांत्य फेरीचा सामना खेळला जाईल. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तसेच थेट प्रसारण SonyLiv अॅप आणि वेबसाईटवर केले जाईल.
आशियाई खेळ 2023 साठी भारतीय क्रिकेट संघ
ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), आकाश दीप.
बांगलादेश क्रिकेट संघ
जाकेर अली (विकेटकीपर), महमुदुल हसन जॉय, मोसाद्देक हुसेन, परवेझ हुसैन इमॉन, सैफ हसन (कॅप्टन), शहादत हुसेन, यासिर अली, झाकीर हसन, रिपन मंडल, मृत्युंजॉय चौधरी, रकीबुल हसन, रिशाद हुसेन, सुमन खान, तन्वीर इस्लाम, तनझिम हसन साकिब, अफिफ हुसेन.
इतर महत्वाच्या बातम्या