एक्स्प्लोर

भारताने द. आफ्रिकेत वाईट इतिहास पुसत नवा इतिहास रचला

भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला.

पोर्ट एलिझाबेथ : विराट कोहलीच्या टीम इंडियाने पोर्ट एलिझाबेथची पाचवी वन डे जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिल्यांदाच वन डे सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला 201 धावांत गुंडाळून, पाचव्या वन डेत 73 धावांनी विजय साजरा केला. टीम इंडियाने या विजयासह सहा सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशी विजयी आघाडी घेतली. पोर्ट एलिझाबेथचं मैदान आणि भारत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पोर्ट एलिझाबेथमध्ये आतापर्यंत एकही वन डे सामना जिंकलेला नव्हता. आतापर्यंत इथे खेळलेल्या सर्वच्या सर्व पाचही सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. एवढंच नाही, तर केनियानेही भारतावर या मैदानात मात केली होती. पाचही सामन्यांमध्ये भारताला 200 पेक्षा जास्त धावांचा पल्ला ओलांडता आलेला नाही. आतापर्यंत खेळलेला पाच सामन्यांमध्ये भारताची धावसंख्या 147, 179, 176, 163 आणि 142 अशी आहे. मात्र या सामन्यात भारताने 274 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि दक्षिण आफ्रिकेवर मात केली. पोर्ट एलिझाबेथच्या मैदानातला वाईट इतिहास पुसत टीम इंडियाने नवा इतिहास रचला पोर्ट एलिझाबेथची हवा भारताची सर्वात मोठी समस्या पोर्ट एलिझाबेथमधील वेगवान वारं ही भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या होती. फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही या खेळपट्टीवर लय सापडण्यास अडचणी येतात. हवामान विभागानेही सामन्याच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला वेगवान वाऱ्याचा इशारा या सामन्यापूर्वी दिला होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी सर्व समस्यांवर मात करत दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचला. रोहित शर्माचं कमबॅक, शतकी खेळी गेल्या तीन सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं सतरावं शतक झळकावलं. त्याने 126 चेंडूंमधली 115 धावांची खेळी अकरा चौकार आणि चार षटकारांनी सजवली. रोहितने शिखर धवनच्या साथीने 48 धावांची सलामी दिली. मग त्याने विराट कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 105 धावांची आणि श्रेयस अय्यरच्या साथीने चौथ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. 25 वर्षात पहिला मालिका विजय
  • भारताला 1992-93 साली सात वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-5 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2006-07 साली चार वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-4 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2010-11 साली पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-3 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2013-14 साली तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 0-2 ने पराभव स्वीकारावा लागला
  • 2017-18 मध्ये सहा वन डे सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने आघाडीवर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs GT Final IPL 2026 : वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून IPL फायनलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! मैदानातच भिडले कर्णधार पाटीदार अन् अंपायर; विराटचा पारा चढला, नेमकं काय घडलं? पाहा Video
वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटवरून IPL फायनलमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! मैदानातच भिडले कर्णधार पाटीदार अन् अंपायर; विराटचा पारा चढला, नेमकं काय घडलं? पाहा Video
RCB vs GT Final Live Update : गुजरात टायटन्सला सहावा धक्का, राहुल तेवतिया 7 धावांवर बाद, 18 षटकात 137 धावा
RCB vs GT Final Live Update : गुजरात टायटन्सला सहावा धक्का, राहुल तेवतिया 7 धावांवर बाद, 18 षटकात 137 धावा
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Paris News : फुटबॉलचा सामना संपला अन् दगडफेक अन् रस्त्यांवर जाळपोळ! हाय अलर्ट असतानाही पॅरिस कसं पेटवलं? 700 हून अधिक जणांना अटक
फुटबॉलचा सामना संपला अन् दगडफेक अन् रस्त्यांवर जाळपोळ! हाय अलर्ट असतानाही पॅरिस कसं पेटवलं? 700 हून अधिक जणांना अटक

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
Video: नशीबवान हेझलवुडने गिलचा गेम करताच कोहलीचं 'विराट' स्टाईलमध्ये जबरा सेलिब्रेशन अन् अनुष्का शर्माची सुद्धा स्माईल!
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
मराठवाड्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी; कुठे गारा, कुठे वादळवारा, उकाड्यापासून नागरिकांना सुटका
Josh Hazlewood: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Josh Hazlewood Video: फायनलमध्ये गुजराती कॅप्टन गिलचा गेम केलाच, पण नशीब असावं तर जोश हेझलवुडसारखं! आयपीएलच्या इतिहासात असा मान कोणालाच मिळाला नाही!
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
Video: दक्षिण दिल्लीत 5 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू; ढिगाऱ्यात गाडलेल्या 12 वैद्यकीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं, दोघांची प्रकृती गंभीर
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
साताऱ्यात 5 किलो गांजा तर नागपुरात 7 किलो ड्रग्ज जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई, ड्रग्सची बाजारात किंमत किती?
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
Shubman Gill: 'कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या सर्व फॉरमॅटमध्ये मला..' आयपीएल फायनलपूर्वी शुभमन गिलचं मोठं वक्तव्य
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Embed widget