एक्स्प्लोर

इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडिया 8 दिवस बायो बबलमध्ये राहणार, फॅमिलीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी 

टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध 18 जूनपासून विश्व टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ब्रिटन दौऱ्यावर जात आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी जाताना टीम इंडियाला 8 दिवस बायो बबलमध्ये राहावं लागणार आहे.

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी आणि इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या टेस्ट सीरिजसाठी संघाची घोषणा केली आहे.  टीम इंडिया न्यूझीलॅंडविरुद्ध 18 जूनपासून विश्व टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी ब्रिटन दौऱ्यावर जात आहे. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी जाताना टीम इंडियाला 8 दिवस बायो बबलमध्ये राहावं लागणार आहे. इंग्लंडला पोहोचल्यानंतर संघ 10 दिवस क्वारंटाईन राहील.  या दौऱ्यात फॅमिलीला सोबत घेऊन जाण्याची परवानगी देखील मिळाली आहे.  

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 25 मेपासून खेळाडूंचं आठ दिवसांचं बायोबबल सुरु होईल. त्या दरम्यान त्यांची कोविड टेस्ट केली जाईल. 2 जून रोजी टीम इंडिया ब्रिटनला रवाला होईल. तिथं 10 दिवस क्वारंटाईन केलं जाईल. 18 जूनपासून न्यूझीलॅंडविरुद्ध विश्व टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळली जाईल.

परिवाराला सोबत घेऊन जाण्याची परवानगी
टीमचा ब्रिटन दौरा जवळपास तीन महिन्यांचा असेल. शेवटची टेस्ट मॅच 14 सप्टेंबरला संपेल. न्यूझीलॅंडविरुद्ध  विश्व टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत देखील एका महिन्याचं अंतर आहे. त्यामुळं टीमच्या खेळाडूंना परिवाराला सोबत ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.  

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या टेस्ट सीरिजसाठी संघाची घोषणा

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) जून महिन्यात खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी आणि इंग्लंडविरोधातील पाच सामन्यांच्या टेस्ट सीरिजसाठी संघाची घोषणा केली आहे.  बीसीसीआयनं ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.  भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश केलेला नाही. पृथ्वी शॉनं  विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. निवडकर्त्यांनी चार सलामीवीर फलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. यात रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांचा समावेश आहे. केएल राहुलची नुकतीच अपेंडिक्स सर्जरी झाली आहे. तो दौऱ्याआधी फिट झाला तर त्याला संघात स्थान मिळू शकेल.  

मध्यक्रमात चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांचा समावेश आहे. विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पसंती दिली आहे. राहुलसारखंच वृद्धिमान साहा देखील फिटनेस क्लियरंस द्यावं लागणार आहे.  साहा मागील मंगळवारी कोविड-19 संक्रमित झाला होता. तो दौऱ्याआधी फिट असेल त्याला संघात जागा मिळू शकेल. 

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा स्पिन गोलंदाजी कमान संभाळतील. सोबतच अक्षर पटेल आणि वाशिंगटन सुंदर यांचाही समावेश केला आहे. तर कुलदीप यादवला संघात जागा मिळू शकलेली नाही. 

वेगवान गोलंदाजांची तगडी फौज संघात आहे. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा संघात समावेश आहे सोबतच अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अर्जन नागवासवाला आणि आवेश खान या चार खेळाडूंचा स्टॅंडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अंग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.

केएल राहुल आणि साहा (विकेटकीपर) यांना फिटनेस क्लियरंस पास करावं लागेल

स्टँडबाय खेळाडू: अभिमन्यु ईस्वरवान, प्रसिध्द कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला

18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 
18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. भारतीय टीम न्यूझीलंडविरोधात हा सामना खेळेल. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात इंग्लंडविरोधात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.  टीम इंडियानं विराट कोहलीच्या नेतृत्वात आयसीसी विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.  

 

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Sl 1st Test : सरफराजला पुन्हा बाकावर बसवलं! गिलने टॉस जिंकत घेतला धाडसी निर्णय; 3 फिरकीपटूंसह मैदानात, अशी आहे टीम इंडियाची Playing XI
सरफराजला पुन्हा बाकावर बसवलं! गिलने टॉस जिंकत घेतला धाडसी निर्णय; 3 फिरकीपटूंसह मैदानात, अशी आहे टीम इंडियाची Playing XI
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
On This Day : इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?
इंग्रजांचा भयंकर मारा, पराभवाची टांगती तलवार... अन् तेव्हाच सचिनच्या बॅटने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं; आजच्या दिवशी 1990मध्ये नेमकं काय घडलं होतं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget