Davis Cup : टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार! पुन्हा एकदा मैदानातील धुमशान रंगणार
Davis Cup : AITA ने अलीकडेच क्रीडा मंत्रालयाकडे 3-4 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड ग्रुप वन प्लेऑफसाठी संघ पाठवता येईल का? याबाबत सल्ला मागितला होता.
![Davis Cup : टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार! पुन्हा एकदा मैदानातील धुमशान रंगणार Team India is expected to be allowed to travel to Pakistan for Davis Cup tennis matches Davis Cup : टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार! पुन्हा एकदा मैदानातील धुमशान रंगणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/31/6ed8b0df276b5a36e33f0f52671ddb371704008347452736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली/कराची : भारतीय संघाला (Team India) डेव्हिस कप टेनिस सामन्यासाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने (एआयटीए) शनिवारी ही माहिती दिली. AITA ने अलीकडेच क्रीडा मंत्रालयाकडे 3-4 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या वर्ल्ड ग्रुप वन प्लेऑफसाठी संघ पाठवता येईल का? याबाबत सल्ला मागितला होता.
"We are hoping to get the clearance soon. We have been told that since it is not a bilateral tournament and the one organised by the ITF, the government does not have the policy to interfere in such events," AITA's Anil Dhupar told PTI about India playing in Pakistan.#DavisCup pic.twitter.com/gb0Tx5kd6K
— Muneeb Farrukh (@Muneeb313_) December 30, 2023
एआयटीएचे सरचिटणीस अनिल धुपर म्हणाले, 'आम्हाला अद्याप लेखी मंजुरी मिळालेली नाही, मात्र लवकरच ती मिळेल. आम्हाला सांगण्यात आले आहे की ही द्विपक्षीय मालिका नसून ती ITA द्वारे आयोजित केली जात असल्याने, सरकार अशा स्पर्धांमध्ये हस्तक्षेप करत नाही. त्याची एक प्रक्रिया आहे. क्रीडा मंत्रालयाने ही विनंती परराष्ट्र आणि गृह मंत्रालयांना पाठवली असून त्यांच्या अभिप्रायानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. आम्हाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा आहे. आम्ही स्पर्धा आणि प्रवासाची तयारी करत आहोत.
Aisam-ul-Haq: "Sports should be kept separate from politics and religion. If India thinks that Pakistan isn't safe, they should know that our players have same reservations but our cricket team, for instance, still played World Cup there. It shows our courage." #DavisCup pic.twitter.com/b8kGu3jiKz
— Muneeb Farrukh (@Muneeb313_) December 28, 2023
दरम्यान, पाकिस्तान टेनिस फेडरेशनने (पीटीएफ) शनिवारी सांगितले की ते इस्लामाबाद येथे होणार्या डेव्हिस कप टायमध्ये एआयटीए खेळाडू आणि अधिकारी यांच्या सहभागाबाबत अंतिम पुष्टीची वाट पाहत आहेत. पीटीएफचे अध्यक्ष सलीम सैफुल्ला म्हणाले, 'एआयटीएफने आम्हाला 11 अधिकारी आणि सात खेळाडूंची व्हिसासाठी यादी पाठवली आहे. आम्ही त्याच्या आगमनाच्या अंतिम पुष्टीची वाट पाहत आहोत. एआयटीएने म्हटले आहे की ते त्यांच्या सरकारकडून पाकिस्तानला जाण्यासाठी परवानगी मिळाल्यानंतरच पुष्टी करतील.
Aisam-ul-Haq: "India says it has security concerns over touring Pakistan, but they have also nominated 18, including players and officials, for the tour and its email says that they may add more people. If there are threats, why are you sending so many people."#DavisCup pic.twitter.com/4rRt6Botpw
— Muneeb Farrukh (@Muneeb313_) December 28, 2023
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)