एक्स्प्लोर
कोहली कर्णधार, युवीचं कमबॅक, टीम इंडियाची घोषणा
मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघांची घोषणा झाली आहे. महेंद्रसिंह धोनीने वन डे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर विराट कोहलीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेण्टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये विराट कोहलीच भारतीय संघाचा कर्णधार असेल.
एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील सीनियर निवड समितीच्या बैठकीत भारतीय संघ जाहीर करण्यात आला.
महत्त्वाचं म्हणजे सिक्सर किंग युवराज सिंहचं टीम इंडियामध्ये कमबॅक झालं आहे. तर दिल्लीचा डावखुरा सलामीवीर शिखर धवनचा वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीमुळे संघात स्थान मिळवू शकलेला नाही.
भारताच्या टी-ट्वेन्टी संघात सुरेश रैना आणि आशिष नेहराचा समावेश झाला आहे. मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणे तसंच अष्टपैलू रवीचंद्रन अश्विन हे दोघंही दुखापतीतून सावरले असून, रहाणे वन डे मालिकेत तर अश्विन वन डे आणि ट्वेन्टी20 मालिकेत सहभागी होईल.
वन डे भारतीय संघ : विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), के एल राहुल, शिखर धवन, मनिष पांडे, केदार जाधव, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव
टी-ट्वेण्टी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मनदीप सिंह, के एल राहुल, युवराज सिंह, सुरेश रैना, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, यजुवेंद्र चहल, मनिष पांडे, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा
संबंधित बातम्या
BCCI चा तांत्रिक घोळ, टीम इंडिया अडकली!
धोनीला कर्णधार बनवणारा मराठमोळा माणूस!
धोनीनं निवृत्ती घेतली असती तर मी धरणं धरलं असतं: गावसकर
कोहलीच्या नेतृत्त्वात धोनी कोणत्या क्रमांकावर खेळणार?
रणजी: पृथ्वी शॉचं शतक, मुंबई फायनलमध्ये
धोनीला कर्णधार बनवणारा मराठमोळा माणूस!
कर्णधारपद सोडण्यामागचा 'कूल धोनी'चा मास्टर प्लान!
धोनीचे 6 चलाख निर्णय, ज्याला तुम्हीही सॅल्युट कराल!
धोनीचा राजीनामा, सगळे बोलले, पण सेहवाग गप्प का?
वन डे, टी20 च्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार
महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर
धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची पाच कारणं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement