एक्स्प्लोर

India vs South Africa: टी-20 वर्ल्डकपच्या 2024 मधील थरारक फायनलनंतर थेट आज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सुपर-8 मध्ये भिडणार; भारतीय संघात बदल? कशी असेल प्लेइंग 11??

टीम इंडिया ग्रुप अ मधून अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका ग्रुप ड मध्ये प्रथम स्थानावर आहे. हे दोन्ही संघ 2024 च्या टी20 विश्वचषक फायनलमध्येही आमनेसामने आले होते, भारताने ऐतिहासिक विजय मिळवला.

India vs South Africa Super 8 Live Streaming: टी20 विश्वचषकात, भारत आपला पहिला सुपर 8 सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघांनी अद्याप विश्वचषकात पराभव पत्करलेला नाही. टीम इंडिया ग्रुप अ मधून अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका ग्रुप ड मध्ये प्रथम स्थानावर आहे. हे दोन्ही संघ 2024 च्या टी20 विश्वचषक फायनलमध्येही आमनेसामने आले होते, जिथे भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. सुपर 8 चे आव्हान आता समोर आहे. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका: लाईव्ह स्ट्रीमिंग

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर 8 सामना आज 22 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. लाईव्ह सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7  वाजता सुरू होईल, टॉस भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता होईल. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना स्टार स्पोर्ट्सवर टेलिव्हिजनवर प्रसारित केला जाईल, तर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅपवर उपलब्ध असेल.

तिलक वर्माला खंबीर पाठिंबा

दरम्यान, तिलक वर्माने या विश्वचषकात 25, 25, 25 आणि 31 अशा धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेटही माफक आहे. असे असूनही कॅप्टन सूर्यकुमार यादवने त्याला पाठिंबा दिला आहे. तिसऱ्या नंबरवर फलंदाजाची भूमिका स्पष्ट करताना तो म्हणाला की, जर एक विकेट पडली तर टिळक पॉवरप्लेमध्ये स्वतःचा नैसर्गिक खेळ खेळू शकतो, मात्र दोन विकेट्स पडल्यास त्याला 10व्या ओव्हरपर्यंत भागीदारी रचण्यावर भर द्यावा लागेल.

संजू सॅमसनबद्दल स्पष्टीकरण

तिलकच्या जागी संजू सॅमसनला खेळवण्याची शक्यता सूर्यकुमारने फेटाळून लावली. सध्या पॉवरप्लेमध्ये संघ 40-50 धावा करत असून ते समाधानकारक असल्याचे त्याने नमूद केले. अभिषेक शर्माने या विश्वचषकात अद्याप एकही धाव काढली नसली तरी सूर्यकुमारने त्याचा बचाव केला आहे. अभिषेक जेव्हा धावा करायला सुरुवात करेल, तेव्हा काय होईल याची कल्पना प्रतिस्पर्धी संघांना असेल, असे मत त्याने व्यक्त केले. जर तो धावा करू शकला नाही, तर संघ त्याची कसर भरून काढण्यास सक्षम आहे असेही तो म्हणाला.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक, एडेन मार्कराम (कर्णधार), रायन रिकेल्टन, देवाल्ड ब्रुविस, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी

खेळपट्टी कशी असेल?

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी सामान्यतः फलंदाजीसाठी अनुकूल आहे. चालू विश्वचषकात येथे तीन सामने खेळले गेले आहेत आणि सहा डावांमध्ये फक्त एकदाच एका संघाने 170 पेक्षा कमी धावा केल्या आहेत. सुपर ओव्हरमध्ये गेलेला दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान सामना याच मैदानावर खेळवण्यात आला. अर्थात, भारत-दक्षिण आफ्रिका सामनाही चौकार आणि षटकारांचा असाच पाऊस पडू शकतो.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget