(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Taipei Open 2022: पारुपल्ली कश्यपची विजयी घौडदौड, दुसऱ्या फेरीत ली चिया-हाओला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
Taipei Open 2022: तपैई ओपन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) चमकदार खेळी करत आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्यानं ली चिया- हाओचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.
Taipei Open 2022: तपैई ओपन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू पारूपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) चमकदार खेळी करत आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्यानं ली चिया- हाओचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. त्यानं दुसऱ्या फेरीत ली चिया- हाओविरुद्ध 21-10, 21-19 असा विजय मिळवलाय. तर, भारताचे बॅडमिंटनपटू मिथुन मंजुनाथ (Mithun Manjunath), प्रियांशु राजावत (Priyanshu Rajawat), किरण जॉर्ज (Kiran George) यांनी निराशाजनक कामगिरी केली. ज्यामुळं त्यांना दुसऱ्या फेरीतून बाहेर पडावं लागलं.
पारूपल्ली कश्यप दमदार कामगिरी
या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये पारूपल्ली दमदार सुरुवात केली. पारूपल्लीनं एकहाती हा सेट जिंकलाय. या सेटमध्ये त्यानं ली चिया- हाओला 21-10 असं पराभूत करून आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ली चिया-हाओनं कडवी त्याला कडवी झुंज दिली. परंतु, त्याचं सर्व प्रयत्न अपयशी ठरले. पारूपल्लीविरुद्ध दुसऱ्या सेटमध्ये त्याला 21-19 असा पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह पारूपल्लीनं तपैईच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.
मिथुन मंजुनाथ, किरण जार्ज, प्रियांशु राजवत आणि समिया फारूकी पराभूत
भारताचा मिथुन मंजुनाथ चौथ्या मानांकित कोडाई नाराओकाकडून 24-22, 5-21, 17-21 असा पराभूत होऊन तैपेई ओपनच्या दुसऱ्या फेरीतून बाहेर पडलाय. प्रियांशु राजावतलाही दुसऱ्या फेरीत चेन चि-टिंगविरुद्ध 19-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागलाय. दरम्यान, किरण जॉर्जला जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या आणि अव्वल मानांकित चाऊ तिएन-चेनविरुद्ध पराभवाला सामोरे जावा लागलं. तर, महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत भारताची महिला बॅटमिंटनपटू सामिया फारूकीनं Wen Chi Hsu विरुद्ध निराशाजनक कामगिरी (18-21, 13-21) केली.
हे देखील वाचा-
- Michael Bracewell: न्यूझीलंडच्या संघात आक्रमक खेळाडूची एन्ट्री, पदापर्णाच्या सामन्यातील पहिल्याच षटकात घेतली हॅट्रिक!
- Novak Djokovic: नोवाक जोकोविच यूएस ओपन स्पर्धेतून बाहेर? कोरोना लसीला विरोध करणं महागात पडण्याची शक्यता
- ISSF World Cup 2022: भारताच्या कोणत्या खेळाडूनं कोणतं पदक जिंकलं? येथे पाहा संपूर्ण यादी