Novak Djokovic: नोवाक जोकोविच यूएस ओपन स्पर्धेतून बाहेर? कोरोना लसीला विरोध करणं महागात पडण्याची शक्यता
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची (Covid-19 Vaccine) मोहिम सुरु करण्यात आलीय. परंतु,जोकोविचनं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला विरोध दर्शवत लस घेणार नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलंय.
US Open 2022: विम्बल्डन 2022 स्पर्धेत दमदार प्रदर्शन करून विजेतेपद पटकावणाऱ्या सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचला (Novak Djokovic) यूएस ओपन स्पर्धेपूर्वी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी जगभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची (Covid-19 Vaccine) मोहिम सुरु करण्यात आलीय. परंतु,जोकोविचनं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला विरोध दर्शवत लस घेणार नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलंय. ज्यामुळं त्याला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेत खेळण्याची परवागनी मिळाली नव्हती. अमेरिकेतील कोरोना निर्बंधांनुसार, यूस ओपन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी कोरोना प्रतिबंधक लस घेणं बंधनकारक आहे. जोकोविचनं अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नाही. यामुळं त्याला या स्पर्धेला मुकावं लागण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या कोरोना निर्बंधांनुसार, अमेरिकेत दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं कोरोनाची लस घेणं बंधनकारक आहे. जोकोविच लसीकरणाच्या या अनिवार्यतेच्या विरोधात आहे. कोरोनाची लस घ्यायची की नाही? हा त्याचा व्ययैतिक अधिकार आहे. तसेच सरकारनं कोणत्याही व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास सक्ती करू नये. आपल्या या निर्णयावर जोकोविच ठाम आहे आणि त्यानं अजूनही कोरोनाची लस घेतलेली नाही.
यूएस ओपनच्या निवेदनात काय म्हटलंय?
महत्वाचं म्हणजे, यूएस ओपननं नुकतीच महिला आणि पुरुष एकेरी स्पर्धांसाठी खेळाडूंची यादी जाहीर केलीय. या यादीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच्याही नावाचा समावेश आहे. मात्र, यूएस ओपनच्या निवेदनात असं म्हटलं गेलं आहे की, "यूएस ओपनमध्ये लसीकरणाबाबत कोणतीही सक्ती नाही. परंतु, यूस ओपन अमेरिका सरकारच्या कोरोना निर्बंधांचं पालन करत आहे. ज्यामुळं जोकोविच यूस ओपन स्पर्धेतून बाहेर होण्याची दाट शक्यता आहे.
विम्बल्डन स्पर्धेत जोकोविचची ऐतिहासिक कामगिरी
विम्बल्डन 2022 या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देऊन विजेतेपद पटकावलं. जोकोविचनं सलग चौथ्यांदा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केलाय. तसेच त्याच्याकडं 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत. या कामगिरीसह त्यानं रॉजर फेडररला मागे टाकलं आहे.
हे देखील वाचा-
- Nikita Kamlakar: आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरची कन्या निकिता कमालकरनं रौप्य पदक पटकावलं!
- Taipei Open 2022: पारुपल्ली कश्यपचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, प्रियांशू रजावत आणि मिथुन मंजुनाथचंही दमदार प्रदर्शन
- ISSF World Cup 2022: चांगवॉन नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचा दबदबा, सर्वाधिक पदकं जिंकून अव्वल स्थानावर