India vs New Zealand Semifinal : वर्ल्डकपच्या सेमीफायनलचा महामुकाबला काही तासावर अन् टीम इंडियाला सुनील गावसकरांचा कडक इशारा!
टीम इंडिया आणि न्यूझीलंड सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवर ( Semi Finals clash between India and New Zealand) लिटील मास्टर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कडक इशारा दिला आहे.
India vs New Zealand Semifinal : आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या प्रवासात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, टीम इंडिया आणि न्यूझीलंड सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवर ( Semi Finals clash between India and New Zealand) लिटील मास्टर माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कडक इशारा दिला आहे. तसेच फूटवर्क आणि धोरणात्मक दृष्टिकोनामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला भारतीय फिरकी गोलंदाजांना, विशेषत: कुलदीप यादवला उपांत्य फेरीत सामोरे जाण्यात अडचणी येणार नाहीत, असे मत व्यक्त केलं आहे.
Kane Williamson during practice session. pic.twitter.com/cxKLE8E08g
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 14, 2023
सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, तो (केन विल्यमसन) अनुभवी खेळाडू आहे आणि दीर्घ विश्रांतीनंतर तो पुनरागमन करत असला तरी काही फरक पडत नाही. त्याने धावा केल्या आहेत.
Wankhede Stadium ahead of the Semi Finals clash between India and New Zealand.pic.twitter.com/wJwzdaArZM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 14, 2023
तो पुढे म्हणाले की, तो त्याच्या स्टेप्सचा चांगला वापर करतो. टर्नचा सामना करण्यासाठी तो त्याच्या क्रीजचा चांगला वापर करतो. तो खूप चांगला खेळाडू आहे आणि त्यामुळे कुलदीपला खेळण्यात त्याला काही अडचण येईल असे मला वाटत नाही. कुलदीपचा सामना करताना अडचण येईल, असे वाटत नाही.
Rohit Sharma said "We have backed certain players whom we have given certain roles - we will stand with them, we have to give credit to Rahul Dravid, will continue this in future as well - role clarity & giving freedom is so vital". [RevSportz] pic.twitter.com/xg2kNdJuuE
— Johns. (@CricCrazyJohns) November 14, 2023
गावसकर म्हणाले की, विल्यमसनची फलंदाजी केवळ त्याचे तांत्रिक ज्ञान आणि स्ट्रोकप्लेपुरती मर्यादित नाही आणि गरज पडेल तेव्हा तो लांब शॉट्स खेळण्यातही पटाईत आहे. ते म्हणाले की, "गरज पडल्यास तो स्ट्राईक रोटेट करण्यावर भर देईल, पण जर एखादा लूज बॉल असेल तर तो त्यावर चौकारही मारेल. 2019 मध्ये केन विल्यमसनचा हा फॉर्म आम्हाला दिसला नाही, पण इथेही आम्ही त्याला फटके मारताना पाहिले आहे. तो कुलदीप यादवविरुद्धही अशी वृत्ती स्वीकारू शकतो.
Journalist: When you reflect back, a young boy playing at this ground and now leading in a high profile game - do you get time to reflect on this journey?
— Johns. (@CricCrazyJohns) November 14, 2023
Rohit said "Focus is on the game, not my journey, probably I will think about my journey after 19th but now it's business,… pic.twitter.com/75KPRF1rNJ
विल्यमसनची पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाची खेळी
श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात 14 धावा करणाऱ्या केन विल्यमसनने पाकिस्तानविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी केली. पाकिस्तानविरुद्ध विल्यमसनने 79 चेंडूत 95 धावांची तुफानी खेळी केली. त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले गेले.
इतर महत्वाच्या बातम्या