Virat Kohli On Sunil Chhetri: निवृत्तीच्या घोषणेआधी सुनील छेत्रीचा मला मेसेज, गेल्या काही वर्षांमध्ये...; विराट कोहली काय म्हणाला?
Virat Kohli On Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज विराट कोहलीने कमेंट केली होती.
Indian Men's Football Team Captain Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) निवृत्तीची घोषणा केली आहे. आज सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत सुनील छेत्रीने याबाबत माहिती दिली. विश्वचषक पात्रता फेरीत कुवेतविरुद्ध तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असल्याचे सुनील छेत्रीने सांगितले.
सुनील छेत्रीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज विराट कोहलीने (Virat Kohli) कमेंट (Virat Kohli On Sunil Chhetri Retirement) केली होती. सुनील छेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओवर विराट कोहलीने माझा भाऊ...गर्व आहे, (My Brother Proud) अशी कमेंट केली. यानंतर आता विराट कोहलीने मुलाखत दिली. त्यात सुनील छेत्रीने निवृत्तीआधी मला मेसेज केला होता, अशी माहिती दिली.
विराट कोहली काय म्हणाला?
सुनील छेत्री हा माझा चांगला मित्र आहे. जेव्हा तो निवृत्तीची घोषणा करणार होता तेव्हा त्याने मला मेसेज केला होता. गेल्या अनेक वर्षांमध्ये आम्ही खूप जवळ आलो आहोत. मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो, तो खूप सुंदर व्यक्ती आहे, असं विराट कोहलीने सांगितले. दरम्यान, सुनील छेत्रीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द चमकदार राहिलेली आहे. सुनील छेत्रीने भारतासाठी 145 सामने खेळले. 20 वर्षांच्या या कारकिर्दीत त्याने 93 गोल केले.
Virat Kohli said "Sunil Chhetri is my really dear friend. He messaged me when he was going to announce his retirement. We become really close over the years. I wish him all the very best, he is such a lovely lovely guy". [RCB] pic.twitter.com/tzaL138ZAk
— Johns. (@CricCrazyJohns) May 17, 2024
सुनील छेत्री भावूक-
सुनील छेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो निवृत्तीची घोषणा करताना खूपच भावूक असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील छेत्रीने पदार्पणाच्या सामन्याची आठवण काढली. याशिवाय तो त्याच्या सुखी सरांबद्दल सांगताना दिसतो. खरे तर सुनील छेत्रीच्या पहिल्या सामन्यात सुखी सर प्रशिक्षक होते. सुनील छेत्री म्हणतो की, तो त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातील भावनांचे वर्णन करू शकत नाही. त्या सामन्यात मी माझा पहिला गोल केला. विशेषत: जेव्हा मी टीम इंडियाची जर्सी घातली होती, तेव्हा एक वेगळीच अनुभूती होती, तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही, असं सुनील छेत्रीने सांगितले.
निवृत्तीची घोषणा करताना सुनील छेत्री काय बोलला?
I'd like to say something... pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024