एक्स्प्लोर
स्मृती सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू तर हरमनप्रीत आयसीसी ट्वेंटी-20 संघाची कर्णधार
स्मृतीला वन डे सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही घोषित केले आहे. आयसीसीच्या महिला क्रिकेटपटूच्या वन डे क्रमवारीत ती चौथ्या तर ट्वेंटी-20 क्रमवारीत 10व्या स्थानावर आहे. आयसीसीचा हा मानाचा पुरस्कार जिंकणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
मुंबई : महाराष्ट्राची कन्या आणि भारतीय महिला संघाची फलंदाज स्मृती मानधनाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( ICC) सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे. सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा राचेल हेयहोए फ्लिंट पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्मृतीला वन डे सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही घोषित केले आहे. आयसीसीच्या महिला क्रिकेटपटूच्या वन डे क्रमवारीत ती चौथ्या तर ट्वेंटी-20 क्रमवारीत 10व्या स्थानावर आहे. आयसीसीचा हा मानाचा पुरस्कार जिंकणारी ती दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी 2007 मध्ये दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामीला वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
स्मृतीने 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत 12 वन डे सामन्यात 66.90च्या सरासरीने 669 धावा केल्या आहेत, तर 25 ट्वेंटी -20 सामन्यांत तिने 130.67च्या स्ट्राईक रेटने 622 धावा चोपल्या आहेत. स्मृतीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप ट्वेंटी-20 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तिने या स्पर्धेत पाच सामन्यांत 125.35च्या स्ट्राईक रेटने 178 धावा केल्या आहेत.
आता विश्वचषक जिंकायचाय
विश्वचषक जिंकणं हेच आपलं ध्येय असल्याचे स्मृतीने म्हटले आहे. ती म्हणाली की एकाच वेळी 2 पुरस्कार मिळणे ही खूप गौरवाची बाब आहे. जेव्हा आपण चांगला खेळ करतो तेव्हा आपला संघ जिंकावा एवढीच इच्छा असते. त्यात आपल्या चांगल्या कामगिरीची जेव्हा पावती मिळते, तेव्हा आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. विश्वचषक आम्हाला जिंकता आला नाही, त्यामुळे आता लक्ष्य एकच ते म्हणजे विश्वचषक, अशी इच्छा तिने व्यक्त केली.
हरमनप्रीत कौरकडे ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व
आयसीसीने सोमवारी वन डे व ट्वेंटी -20 संघ जाहीर केला. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्याकडे ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. ट्वेंटी-20 संघात हरमनप्रीतसह भारताच्या स्मृती आणि पूनम यादव यांनी स्थान पटकावले आहे. वन डे संघात मात्र हरमनप्रीतला स्थान पटकावता आलेले नाही. स्मृती आणि पूनम या दोनच भारतीय खेळाडू वन डे संघात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
करमणूक
Advertisement