Shubman Gill : इकडं शुभमन गिलला सर्वात मोठा पराक्रम करण्याची सुवर्णसंधी; तिकडं सामना पाहण्यासाठी सारा हजर!
टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकप एन्ट्री केली. आज बांगलादेशविरुद्ध त्याला कारकिर्दीमधील सर्वात मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.
पुणे : वर्ल्डकपमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये डेंग्यूग्रस्त झाल्याने मुकलेला टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिलने पाकिस्तानविरुद्ध वर्ल्डकप एन्ट्री केली. या सामन्यात त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत दमदार सुरुवात केली होती. मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही. तो 16 धावांवर बाद झाला. मात्र, आज बांगलादेशविरुद्ध त्याला कारकिर्दीमधील सर्वात मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.
शुभमन गिलला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आजवर कोणालाही वेगाने 2 हजार धावा पूर्ण करता आल्या नाहीत, त्या पूर्ण करण्याची संधी आहे. त्याला दोन हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या 67 धावांची गरज आहे. त्याने हा पराक्रम आजच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केल्यास हा पराक्रम त्याच्या नावावर जमा होईल. त्याने आतापर्यंत 36 सामन्यात 1933 धावा केल्या आहेत. त्याने 6 शतके झळकावली आहेत. त्याने द्विशतक ठोकण्याचा पराक्रमही केला आहे. त्यामुळे आजच्या गिलच्या खेळीकडे सर्वांच्या नजरा असतील.
सारा तेंडुलकरही मैदानात उपस्थित
दुसरीकडे, दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही मैदानात उपस्थित आहे. विशेष म्हणजे साराला कथितरित्या शुभगन गिलची मैत्रीण समजले जाते. शुभमन गिल गेल्या काही काळापासून सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतच्या त्याच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अलीकडच्या काळात त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या.
Sara Tendulkar watching the match in Pune
— Ankur (@ankurumm) October 19, 2023
Gill Masterclass Loading.....#INDvsBAN #indiavsbangladesh pic.twitter.com/TLzuoTZ1Yi
दरम्यान, शुभमन आणि सारा त्यांच्या कथित ब्रेकअपच्या अफवांनंतर पुन्हा मैत्रीत असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर सारा तेंडुलकरने शुभमनची बहीण शाहनील गिललाही इन्स्टाग्रामवर फॉलो करायला सुरुवात केली आहे. शुभमन गिल आणि साराच्या सोशल मीडिया एक्सचेंजचे काही जुने स्क्रीनशॉट्स इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
Sara Tendulkar is in the house😀#INDvBAN #indiavsbangladesh #Saratendulkar #ShubmanGill pic.twitter.com/HolLVxNIpK
— Nikhil 🇮🇳 (@niks9326) October 19, 2023
एका इमेजमध्ये शुभमनच्या वाढदिवसाला लाइव्ह सेशनवर कमेंट दिसली होती. ज्यामध्ये 'HBDDDDDDD' असे लिहिले होते. दरम्यान, शुभमन गिल अभिनेत्री सारा अली खानला डेट करण्यासाठी चर्चेत आला होता, जेव्हा दोघे दिल्लीत काही वेळा एकत्र दिसले होते.
Shubman Gill's Ex girlfriend Sara Tendulkar is currently at MCA stadium, Pune to watch #INDvBAN pic.twitter.com/Qz9jQhG01C
— Visheshta Jotwani 🇮🇳 (@visheshtaaa_j15) October 19, 2023
इतर महत्वाच्या बातम्या