एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विराट कोहली चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी साशंकता
धरमशाला: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धरमशालाच्या चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळं खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबईचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरला धरमशालातल्या भारतीय संघात सामील होण्याचा तातडीचा संदेश बीसीसीआयनं दिला आहे.
रांची कसोटीच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना विराटचा उजवा खांदा दुखावला होता. भारतीय कर्णधारानं ती दुखापत बाळगूनच रांची कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी केली. दुसऱ्या डावात त्यानं क्षेत्ररक्षणही केलं. पण विराटनं आज धरमशालामध्ये टीम इंडियाच्या नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करणं कटाक्षानं टाळलं.
भारतीय संघ उद्या पुन्हा सरावासाठी धरमशालाच्या मैदानात उतरेल. त्या वेळी विराट कोहली नेट्समध्ये फलंदाजी करतो का? यावर साऱ्यांचीच नजर राहिल. कारण धरमशालाच्या चौथ्या आणि निर्णायक कसोटीत विराट कोहलीनं खेळणं आणि मोठी खेळी उभारणं हे टीम इंडियाच्या दृष्टीनं आवश्यक आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement