एक्स्प्लोर

धवननं सहवागची वृत्ती घेतली, आता धावांची भूकही घ्यावी!

टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज अफगाणिस्तानविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत नवा इतिहास घडवला. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहाराआधीच शतक झळकावणारा तो भारताचा पहिला आणि जगातला सहावा फलंदाज ठरला. पण दुर्दैवाची बाब म्हणजे शिखर धवन पुन्हा अल्पसंतुष्ट ठरला. उपाहारानंतर एक खराब फटका खेळून तो माघारी परतला आणि कारकीर्दीत एक मोठी खेळी उभारण्याची संधी त्यानं वाया दवडली. अशी संधी वारंवार मिळत नसते, हे धवनला आता लक्षात घ्यायला हवं.

मुंबई : टीम इंडियाचा गब्बर खूश झाला आहे. कारण बंगळुरू कसोटीतल्या शतकानं त्याच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद झाली. पण टीम इंडियाचं दुर्दैव म्हणजे धवनचं पोट त्या विक्रमी शतकानंच भरलं. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी उपाहाराआधी शतक झळकावणारा शिखर धवन हा भारताचा पहिला आणि जगातला सहावा फलंदाज ठरला. त्याच्या फलंदाजीनं मायबाप पब्लिकही खूश झालं. पण शिखर धवननं चिन्नास्वामी स्टेडियमवर एक महाविक्रमी खेळी उभारण्याची संधी वाया दवडली. अफगाणिस्तानच्या यामिन अहमदझाईला त्यानं आपली विकेट बहाल केली. अर्थात धवननं बाद होण्याआधी एक आगळा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहाराआधी शतक झळकावणारा तो हा भारताचा पहिला आणि जगातला सहावा फलंदाज ठरला. आपण पाहूयात शिखर धवनआधी हा पराक्रम कोणी कोणी गाजवला आहे? 1902 साली ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रम्पर यांनी, 1926 साली ऑस्ट्रेलियाच्याच चार्लस मॅकार्टनी यांनी, 1930 साली ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहाराआधी शतक साजरं केलं होतं. 1976-77 सालाच्या मोसमात पाकिस्तानच्या माजिद खाननं न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत पहिल्या दिवशी उपाहाराआधी शतक ठोकलं होतं. 2016-17च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर हा पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी उपाहाराआधी शतक ठोकणारा पाचवा फलंदाज ठरला. टीम इंडियाच्या गब्बरनं त्या पाचजणांच्या पावलावर पाऊल ठेवताना चौकार आणि षटकारांची जणू उधळण केली. बंगळुरू कसोटीत पहिल्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला, त्या वेळी धवननं 91 चेंडूंत 19 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 104 धावांची खेळी उभारली होती. याचा अर्थ खाईन तर तुपाशी या बाण्यानं खेळून त्यानं ९४ धावा निव्वळ चौकार आणि षटकारांनी जमवल्या. उपाहारानंतर धवननं आपल्या धावसंख्येत केवळ चार धावांची भर घातली आणि तो माघारी परतला. शिखर धवनला खरं तर बंगळुरूत एक मोठी खेळी उभारण्याची संधी होती. समोरचं आक्रमण अननुभवी होतं आणि टीम इंडियाच्या हाताशी मुबलक वेळही होता. पण ट्वेन्टी ट्वेन्टी आणि कसोटी क्रिकेट या मानसिक द्वंद्वातून टीम इंडियाचा गब्बर अजूनही बाहेर पडलेला दिसत नाही. आयपीएलमधला आपला फॉर्म कायम राखताना त्यानं ट्वेन्टी ट्वेन्टीला साजेसा फटका खेळूनच आपली विकेट बहाल केली. शिखर धवन हा एक आक्रमक फलंदाज आहे. दोन घ्यायचे आणि दोन द्यायचे ही त्याच्या फलंदाजीची वृत्ती आहे, याची आम्हालाही कल्पना आहे. पण धवननं ज्याच्याकडून आक्रमक फलंदाजीचा वारसा घेतला आहे, त्या वीरेंद्र सहवागनं कसोटी क्रिकेटमध्ये एक नाही, तर दोन दोन त्रिशतकं ठोकली आहेत. सहवागचा हा आदर्श बाळगून धवननं धावांची भूक वाढवायला हवी. पण त्यासाठी कसोटीत बॅट लागलीय आणि धावांचा ओघ सुरूय अशा वेळी खराब फटके टाळायचे असतात हे धवनला आम्ही सांगण्याची गरज नाही. शिखर धवनआधी हा पराक्रम कोणी कोणी गाजवला? 1902 - ऑस्ट्रेलिया - व्हिक्टर ट्रम्पर, 1926 - ऑस्ट्रेलिया - चार्लस मॅकार्टनी, 1930 - ऑस्ट्रेलिया - डॉन ब्रॅडमन (इंग्लंडविरुद्ध कसोटी) 1976-77 - पाकिस्तान - माजिद खान - (न्यूझीलंडविरुद्ध कसोटी) 2016-17 - ऑस्ट्रेलिया - डेव्हिड वॉर्नर - (पाकिस्तानविरुद्ध सिडनी कसोटी) संबंधित बातम्या :
पहिल्या दिवशी उपहारापूर्वी कसोटी शतक, धवन पहिला भारतीय
धवन-विजयचं शतक, शेवटच्या सत्रात अफगाणिस्तानचं पुनरागमन
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
पंतप्रधान मोदींनी घेतला राज ठाकरेंच्या नातवाचा गालगुच्चा, नंतर फोटोही काढला
Embed widget